आषाढी एकादशी निमित्ताने संत सेना महाराज विठ्ठल मंदिर नवीन कौठा येथे पालखी मिरवणूक व किर्तन कार्यक्रम..
नवीन नांदेडl आषाढी एकादशी निमित्ताने श्री.संत शिरोमणी सेना जी महाराज विठ्ठल रखुमाई मंदिर व सांस्कृतिक सभागृह ट्रस्ट यांच्या वतीने आषाढी एकादशी सोहळ्याचा निमित्ताने पालखी मिरवणूक व हभप राम महाराज सुगावकर यांच्या किर्तन आयोजन १७ जुलै रोजी करण्यात आले आहे.
नांदेड शहातील नाभिक समाज बांधवांना व पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळीना कळविण्यात येत आहे दर वर्षी प्रमाने याही वर्षी दि.१७ जुलै २४ वार बुधवार या दिवशी आषाढी एकादशी निमित्त श्री संत शिरोमणी सेना जी महाराज विठ्ठल रुखमाई मंदिर व सांसकृतिक सभागृह ट्रस्टच्या माध्यमातून आषाढी एकादशी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने सकाळीं ठीक ७ ते ८ वा.श्रीचा अभिषेक व सकाळीं ९ ते १:३० वाजेपर्यंत टाळ वीणा मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक श्री संत सेना महाराज मंदिर ते साईबाबा मेंन रोड कमान ,शर्मा ट्रॅव्हल्स पासून जुना रोड ते सेना महाराज मंदिर अशी पायी पालखी मिरवणूक होणार आहे. व लगेच 11 ते 1 वाजेपर्यंत ह.भ.प राम महाराज सुगावंकर
यांचे हरी कीर्तन होणार आहे तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी नी व सखल नाभिक समाज बांधवांनी आषाढी एकादशी निमित्त उपस्थित राहावे अशी विनंती श्री संत सेना महाराज विठ्ठल रुखामाई मंदीर सांस्कृतिक सभागृह ट्रस्ट नविन कौठा नांदेड व महाराष्ट्र नाभिक महामंडळ नांदेड जिल्हा यांनी केले आहे.
