
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेतील दि १० रोजी एका ८ वर्षीय विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ८ वाजताच्या सुमारास घडली या घटनेची माहिती वार्यासारखी पसरल्याने शाळेतील इतर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे पालक व आदिवासी संघटना यांचा मोठा जमाव ग्रामीण रुग्णालय परिसरात जमला होता.
रोहीत मुकाडे याच्या मृत्यूस कारणीभूत असणार्या शाळा प्रशासनातील अधिक्षक मुख्याध्यापक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसह समधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थिती लावणार नाहीत तो पर्यंत मृत देहाचे शश्वविच्छद होऊ देणार नाही असा ठाम पवित्रा नातेवाईक व संघटनांनी घेतल्याने रुग्णालय परीसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
निवाशी आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता दुसर्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या रोहीत प्रविण मुकाडे रा,चिखली ता,महागाव या ८ वर्षीय बालकास उपचारासाठी माहुर येथिल ग्रामीण रुग्णालयात दि १० रोजी रात्री ७ वाजुन २० मी.दाखल करण्यात आले व तेथे प्रथमोपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने ७ वाजुन ३० मी त्यास पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते परंतु केवळ ग्रामीण रुग्णालया पासुन अवघ्या १३ की मी अंतरावर रोहीत मृत्यू झाल्याने त्याच रुग्णवाहिकेतून मृत देह ग्रामीण रुग्णालयात आणला असल्याने दि ११ रोजी सकाळ पासुनच तालुक्यातील समाज बाधव, संघटना व नातेवाईक यांनी शाळांच्या व्यवस्थापणावर प्रश्न चिन्ह निर्माण करीत रोहीत च्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते पोलिस व नातेवाईक यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी हे प्रक्षिशन करीता गेल्याने त्यांचे प्रतिनिधि म्हणून आलेल्या किनवटच्या तहसीलदार मृणाल जाधव,माहूरचे उपविभागिय पोलीस अधिकारी दादाराव सीनगारे व उमरखेड येथील माजी आमदार उत्तम इगळे यांनी यशस्वी शिष्टाई केल्याने तब्बल १७ तासा नंतर दि.११ रोजी १३.३० वा प्रेत शवविच्छेदना करीता नांदेड येथे हलविण्यात आले. या वेळी उमरखेड मतदार संघाचे माजी आ. उत्तमराव ईगंळे यांनी माहुर येथिल ग्रामीण रुग्णालयात मयत रोहीत यांच्या नातेवाईक यांची भेट घेऊन सदरील दोन कर्मचारी यांना निलंबित केले असल्याचे सांगितले खरे पण शासन स्तरावर तसे आदेश त्या वेळे पर्यंत पाहावयास मिळते नव्हते हे विशेष.
चिमुकल्या रोहीत मृत्यूचे पडसाद गंभीर उमटले असून शाळा व्यवस्थापनावर संतप्त झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न ठेवण्याचा निर्णय घेत मुलांना आपल्या सोबत घेऊन जाने पसंद केल्याने येथिल व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी समाजाच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले. सदरील आश्रम शाळेत १ ते ८ पर्यंत वर्ग असून ३०० च्या जवळ पास विद्यार्थी संख्या आहे, विद्यार्थी चा मुत्यू झाल्याची वार्ता समजताच पालकांनी आश्रम शाळेत गर्दी केली परंतु तेथे अधिक्षक मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी कोनीही उपस्थित नसल्याने शाळा व्यवस्थापने वर ठपका ठेवत सावध पवित्रा घेत पालकांनी आपल्या पाल्याना सोबत घेउन गेल्याने संपुर्ण शाळा विद्यार्थी विणा खाली झाल्याने ओस पडली आहे.
शाळा व्यवस्थापनाच्या हलगर्जी पणामुळे रोहितचा मृत्यू झाला आहे.या मृत्यूची जवाबदारी निश्चित करून दोषी विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,कुटुंबाच्या सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे तर मयत रोहित हा दगवल्या नंतर त्याला रुग्णालय आणण्यात आले अशी माहिती आहे.शवविच्छेदनात जर अशे आढळल्यास माहूर ग्रामीण रुग्णालयातील ज्या डॉक्टरांनी त्यास रेफर करून प्रेताची अहवेलना केली त्यांचावर सुद्धा कार्यवाही व्हावी. विनोद खूपसे , तालुका अध्यक्ष बिरसा ब्रिगेड माहूर
