हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश संकलन पर सेल्फी अपलोड कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी स्वतःची सेल्फी काढून कला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी तथा कार्यक्रमाचे संयोजक डॉ. शिवाजी भदरगे यांनी करून कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका विशद केली. व स्वतः ची एक सेल्फी काढून माटी के नाम पर समर्पित केली. तदनंतर रासेयो सहकार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. एल. बी. डोंगरे यांनी सुध्दा एक सेल्फी माटी के नाम काढून राष्ट्राप्रति समर्पित केली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे नॅक समन्वयक व वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गजानन दगडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. डॉ. दिलीप माने, इंग्रजी विषयाचे प्रमुख प्रा. प्रविण सावंत, प्रा. एम. पी. गुंडाळे, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सविता बोंढारे, प्रा. डॉ. डी. सी. देशमुख, मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पवार एल. एस., हिन्दी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. शेख शहेनाज, वनस्पती शास्त्राचे प्रमुख प्रा. डॉ. शाम इंगले, पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रा. महेश वाखरडकर तसेच प्रा. मुकेश यादव, पर्यावरण शास्त्राचे प्रमुख प्रा. आशिष दिवडे, तसेच प्रा. कृष्णानंद पाटील, गणित विषयाचे प्रमुख प्रा. डॉ. सय्यद जलिल, इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. वसंत कदम, ग्रंथपाल प्रा. राजू बोंबले, वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. संगपाल इंगळे, प्रा. शेरेकर, प्रा. डी. के. मगर तसेच प्रा. पंडित हाके, प्रा. राजू धुळे, प्रा . वसुंधरा तोटावाड, प्रा. संदिपाल निखाते, प्रा. परमेश्वर मुपडे, प्रा. रायबोळे, प्रा. सुजित कमलाकर आणि कार्यालयीन अधिक्षक श्री संदीप हरसुलकर, मुख्य लिपिक श्री. लक्ष्मण कोलेवाड, श्री. साहेबराव असळकर, श्री. बालाजी चंदापुरे, श्री. सचिन कदम. श्री. राहुल भरणे, श्री. प्रभू पोराजवार, नगारे ताई व मस्के ताई आदींसह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहून जवळपास 188 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सेल्फी काढून मातीप्रति प्रेम व देशाभिमान वाढवला.