नांदेड| सध्या देशात शिक्षणाचे खाजगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून शासन अनेक सरकारी शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहे. हे शैक्षणिक धोरण हे महात्मा फुले यांना अभिप्रेत असणार्या मोफत व सक्तीचे शिक्षण यापासून कोसो दूर जात आसून शिक्षण व्यवस्था भांडवलदाराच्या हातात देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे. असे प्रतिपादन भारतीय पिछडा शोषित संघटनेने आयोजित जिल्हास्तरीय सत्यशोधक शिक्षकरत्न सन्मान सोहळ्यात व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. व्यंकटेश काब्दे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.जी. माचनवार होते. प्रसिद्ध उद्योजक बालाजी इबितदार यांच्या हस्ते जिल्ह्यातील सहा महिला शिक्षिका व एका शिक्षकास सन्मानपत्र वितरण करण्यात आले. यावेळी विचार मंचावर चंद्रकला चापलकर, अरुणा पुरी, बालाजी थोटवे, अनिरुद्ध वाघमारे, पद्माकर बाबरे, नंदकुमार कोसबतवार, यांची उपस्थिती होती. डॉ. काब्दे पुढे म्हणाले, संविधानाने शिक्षणाची संधी आज उपलब्ध करून दिले आहे. तुमच्यासारख्या शिक्षकानेच मला घडवले आहे. माझे आई-वडील अक्षरशून्य होते तरी मी इथपर्यंत येऊन पोहोचलो ते केवळ माझ्या गुरुजनांमुळे. म्हणून शिक्षकांची भूमिका ही विद्यार्थ्याप्रती तळमळीची व त्यांच्या विकासाची असावी असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. मारुती लुटे मानपत्राचे वाचन प्रा.डॉ. रमेश शेटे प्रास्ताविक रवींद्र बंडेवार, प्रा.डॉ. दिलीप काठोडे यांनी केले. सावित्री वंदना सौ. संगिता राऊत यांनी गायली आभार प्रा.डॉ. बालाजी यशवंतकर यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय पिछडा शोषित संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र शिंदे, प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रा. श्रीमंत राऊत, प्रा.डॉ. अमोल काळे, महासचिव राजेशजी चिटकुलवार, प्रज्ञाधर ढवळे यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाला उपस्थित सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य लक्ष्मणराव डी.एम. हनुमंते, रमेश गोवंदे, शिंदे, उमेशराव पांचाळ, संजय मोरे, व्यंकटराव पार्डीकर, गंगाधर नंदेवाड, गोडसे महाराज, गोविंदराम शुरनर, माधव कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
फुले दांपत्याच्या शैक्षणिक भूमिकेमुळे बहुजनांपुढे नव्या संधी निर्माण झाल्या- बालाजी इबितदार
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांनी १८४८ पासून या देशात बहुजनांना शिक्षणाची सुरुवात करून दिली आणि तेच विचार डॉ. बाबासाहेबांनी आपल्या संविधानात लिखित स्वरूपात मांडले म्हणून आजच्या सामाजिक व्यवस्थेत आपणास ताठ मानेने जगता येत आहे. पण देशातील शिक्षण व्यवस्था कारकून निर्माण करण्याची मानसिकता घडवत असतानाही २१ व्या शतकात आज नव्या संधी निर्माण झाल्या असून, त्याचं सोनं करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करावं, केवळ नोकरीतच नाही तर स्वतंत्रपणे पायावर उभे राहून उद्योगाकडे एक नव्वदलन म्हणून पाहण्याची दृष्टी विद्यार्थ्यात निर्माण करावी अशी भूमिका प्रसिद्ध उद्योजक बालाजीराव इबीतदार त्यांनी मांडली.