हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव तालुक्याच्या प्रचंड प्रमाणात प्रशासकीय स्तरावर जनतेची कामे रखडलेली असुन, ही कामे करण्यासाठी ग्रामीण व शहराच्या सर्वसामान्य जनता प्रशासकीय कार्यालयाच्या चकरा मारुन वैतागलेली आहे. ग्रामीण व शहराच्या नागरिकांनी आता हदगाव विधानसभा क्षेञाचे विद्यमान आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी तहसिल कार्यालयाच्या प्रागणांत ‘जनता दरबारच ‘आयोजन कराव अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातुन होत आहे.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे राजकीय नेते आपल्या भागातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनता दरबार मांडून समस्या तात्काळ सोडवितात. मात्र हदगाव -हिमायतनगर तालुक्यात आता पर्यत कोणत्याहीआमदाराने ‘जनता दरबारचे’ आयोजन केलेले नाही. परिणाम स्वरुप आमच्या ‘व्यथा ‘कुठे मांडाव्यात..? असा थेट प्रश्न ही नागरिक व्यक्त करतांना दिसुन येत आहेत. हदगाव शहरातील काही प्रभागातील ञस्त नागरिकांनी म्हटले आहे की, या पुर्वी गेल्या दहा वर्षापासुन हदगाव न.पा.वर विद्यमान काँग्रेसचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या ताब्यात होती. ह्या दहा वर्षात काही ठराविक नगरसेवकांनी पुढील न.पा.च्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आपल्याच ठराविक प्रभागात विकासाची कामे केलेली आहे. हे कामे करत असताना … ना त्या कामाचा दर्जा राखण्यात आलेला नाही ….. दुसरी गंभीर बाब अशी आहे विशिष्ट समाजाच्या बहुल भागात माञ जाणूनबुजून विकासाची कामे करण्यात न आल्याने याचा परिणाम माञ पुढील येणाऱ्या न.पा.च्या निवडणूकीत विद्यमान आमदार यांना न.पा. ची निवडणूक केवळ काही नगरसेवकांच्या कार्यशैली मुळे कठीण जाणार असल्याची वाढली शक्यता आहे.
हदगाव शहरातील काही ठराविक भाग सोडला तर शहराच्या कोणत्याही भागात नाली व नवीन रोडचे काम योग्यरितीने न झाल्याने पाणी सांडपाणी तिथेच थांबत असल्याने डांसाची निर्मितीचे हे ठिकाण बनलेले आहे. परिणाम स्वरुप शहरात साथीचे रोग व्यतिरिक्त मलेरिया डेंगू चे सर्वात जास्त रुग्ण हदगाव शहरात आढळून येत आहेत. हदगाव शहरात उपजिल्हा रुग्णालय असुन, दररोज शेकडो रुग्ण तालुक्यातून येतात. या रुग्णालयात गेल्या चार महीण्यापासुन वैधकीय अधिक्षक मिळत नाही. नेमके या रुग्णालय मध्ये कोणते तज्ञ डाँक्टर आहेत. यांचा देखील थांगपत्ता जनतेला व रुग्णांच्या नातेवाईकांना लागत नाही. परिणाम स्वरुप याचा ताण रुग्णावर होत असल्याने हे रुगाणालय रुग्णांचे ‘रेफर सेटर ‘झाल्याचे दिसुन येत आहे.
शहरात तहसिल कार्यालय मध्येपण सर्वसाधरण नागरिकांना आतिशय ञास होत असुन, साधे रेशन कार्ड काढण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर या तहसिल कार्यालयाचा पुरवठा विभाग मध्ये गेल्या चार महीण्यापासुन ‘पुरवठा अधिकारीच ‘ नसल्याने यावरुन तहसिल कार्यालयाची काय..? परिस्थिती असेल हे दिसुन येते. जि.प. बांधकाम व सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय सुसज्ज देखणे असुन, या कार्यालय अंतर्गत हदगाव शहरासह तालुक्यात कोट्यावधी रुपांयाची कामे केवळ रामभरोश्यावर होत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही या कामाच्या टक्केवारीने माञ विकास कामाचे तीन तेरा झाले असल्याचे निकृष्ट दर्जावरून दिसून येत आहे.
अश्याच प्रकारे वनपरिक्षेञ विभाग, सामाजिक वणीकरण, पंचायत समिती, महावितरण, गटशिक्षण कार्यालयाच्या संदर्भात जनतेच्या शेकडो तक्रारी आहेत. पण ऐकणार कोण..? अशी परिस्थिती शहरासह ग्रामीण भागातील जनतेची झालेली पाहावयास मिळते आहे. यामुळे हदगाव तालुक्याच्या कोणी ‘व्यथा ‘ऐकणारा नाही का..? अशी प्रतिक्रिया समस्येने ग्रस्त झालेल्या नागरीकातून विचारला जात आहे. हदगाव तालुक्याच्या जनतेची झालेली हि अवस्था पाहता जनतेला वैतागून ‘आमदार साहेब ‘जनता दरबार घ्या हो…. म्हणण्याची वेळ आलेली आहे.
अन् ‘जनता दरबार घ्यायचे आमदार विसरले …!
हदगाव तालुक्याच्या राजकीय इतिहासात आता पर्यत कोणत्याही राजकीय पक्षाच्या आमदारांनी ‘हदगाव तालुक्यात ‘जनता दरबार भरविलेला नाही अशी माहीती मिळाली. माञ तात्कालिक आ.सुभाष वानखेडे व बापुराव पाटील आष्टीकर यांच्या काळात कधी तरी पंचायत समितीची आमसभा व्हायची पण आता ती पंचायत समितीची आमसभा पण होत नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. काही वर्षापुर्वी विद्यमान आमदार माधवराव पा. जवळगावकर यांनी पञकारांशी बोलतांना ‘जनता दरबार ‘ घ्यायच अस सागितले होते. माञ ते विसरुन तर गेले नाही ना ? अणखीन विशेष म्हणजे आता ते स्थानिक पञकाराना पण टाळत आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीतून ते माघार तर घेणार नाहीत ना..? अशी चर्चा विकास व समस्यांनी ग्रस्त झालेल्या जनतेच्या तोंडून ऐकावयास मिळत असल्याच आवर्जून उल्लेख कराव लागेल.