नांदेड। कंधार, लोहा येथील हिवताप कर्मचारी पतसंस्थेचे जवळपास पंचवीस सभासद व मतदार यांनी आज कंधार येथे हिवताप विकास सहकारी पॅनलचा प्रचार दौरा निमित्त आलेल्या सर्व उमेदवार यांचा यथोचित मान सन्मान करुन त्यांना त्यांच्या विजयाचे साक्षीदार आम्ही होणार अशी हमी व ग्वाही दिली.

महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतपेढी म.नांदेड यांची संचालक मंडळ निवडणूक २०२३-२०२८ करीता प्रचार दौरा निमित्त. विकास सहकारी पॅनलच्या सर्व उमेदवार यांच्या ” शिलाई मशीन ” या निशाणीवर मतदान करून प्रचंड मतांनी निवडून आणून विजयाचे साक्षीदार होणार अशी हमी व ग्वाही कंधार व लोहा येथील मतदार यांनी दिली.

विकास सहकारी पॅनल प्रमुख, उमेदवार व हिवताप पतसंस्थेचे चेअरमन सर्वश्री सुभाष कल्याणकर, माणिक गिते, पप्पू नाईक देसाई, सत्यजीत टिप्रेसवार, मोहन पेंढारे, चंद्रभान धोंडगे, बालाजी आळणे, मनोहर खानसोळे, अशोक ढवळे, विठ्ठल मोरे, संतोष माकु, व्यंकट माचनवाड, गिरीश पाटील उमेदवार, आरोग्य कर्मचारी व्यंकटी बकाल, शेख खाजा, प्रभाकर मुंगल, व शाम सावंत उपस्थित होते. होते. सूत्रसंचालन सुधाकर मोरे यांनी केले.
विकास सहकारी पॅनलचा ” वचननामा ” पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आला.

◇ विकास सहकारी पॅनलने पतसंस्थेच्या 👇सभासद हिताची ही कामे केली..
▪︎ कर्जावर एक टक्यांनी व्याज दर कमी केला.
▪︎ सभासदास दिर्घ मुदती कर्ज देण्याची मर्यादा पाच लाख रूपयांवरून सात लाख रूपये केली. पुन्हा सात लाख रूपयांवरुन दहा लाख रूपये केले आहे.
▪︎ आकस्मिक कर्जात पंचवीस हजार रूपयांवरून पन्नास हजार रुपये वाढ केली आहे.
▪︎ मयत सभासद कर्मचारी यांच्या सानुग्रह अनुदानात पाच हजार रूपयांवरून दहा हजार रुपये वाढ केली आहे.
▪︎ सभासदांना विनाविलंब मासिक बैठकीत मान्यता घेतल्या बरोबर कर्ज वाटप करण्यात आले आहे.
▪︎ नेहमीच काटकसरीचा व्यवहार तसेच अनावश्यक खर्चात कपात करून पतसंस्थेचे आर्थिक हित साधले आहे.
▪︎ पतसंस्थेतील अतिरिक्त कर्मचारी कपात करुन आर्थिक बोजा कमी केला आहे.

▪︎ ठेव व लाभांश वाटपात वाढ केली आहे.
▪︎ लेखा परीक्षण (ऑडिट ) मध्ये सतत “अ,ब वर्ग ” दर्जा कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
▪︎ संस्थेच्या गंगाजळी मध्ये वाढ करून संस्थेचा आर्थिक पाया मजबुत व सुरक्षा केला आहे.
▪︎ सभासदांच्या पाल्यांनी दहावी, बारावी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा दरवर्षी यथोचित मान सम्मान आणि भेट वस्तू देवून गौरव / सत्कार करण्यात येत आहे.

◇ विकास सहकारी पॅनलने पतसंस्थेच्या 👇 सभासदांच्या हिताचे पुढील कामे करण्यास उत्सुक आहोत. 

▪︎ सभासदांचा भारतीय जीवन बीमा निगमचा सामूहिक विमा (आकस्मिक व अपघाती समावेश असलेला) सभासदाचा आकस्मिक किंव्हा अपघाती मृत्यू ओढवल्यास त्यांचा आर्थिक लाभ कुटुंबास/ पतसंस्थेत मिळेल अशी विमा पाॅलीसी काढणार…! (येत्या काही दिवसात )
▪︎ पतसंस्थेच्या मालकीची सुसज्ज कार्यालयाची जागा /ईमारत बांधकामासाठी जागा विकत घेणार आहोत. पतसंस्थेच्या ईमारतीत बाहेर गावावरून आलेल्या सभासद बांधवांना राहण्याची व्यवस्था करण्यात येईल.

▪︎ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणार्‍या सभासद बांधवांचा यथोचित मान सम्मान करून काही आर्थिक रक्कम व भेट वस्तू देवून सन्मान करण्यात येईल.
▪︎ सभासदांच्या दिर्घ मुदती कर्ज मर्यादेत वाढ करणार…!
▪︎ आकस्मिक कर्ज मर्यादेतही वाढ करणार…!
▪︎ कर्जाचा व्याज दर कमी करण्याचा प्रयत्न करणार
▪︎ पतसंस्था स्वभांडवलातून चालविता यावी यासाठी योजना आखणार….!
▪︎ सभासदांना दर महा केल्या जाणाऱ्या कपातीची मोबाईल वर एस एम एस व्दारे माहिती देणार….!
▪︎ पतसंस्थेच्या आर्थिक हिता करीता नवनवीन योजना आखणार..असा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.
विकास सहकारी पॅनलचे उमेदवार यांच्या ” शिलाई मशिन ” या निशाणीवर दि.२२ ऑक्टोबर २०२३ रोज रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत नांदेड येथील कार्यालयात मगनपुरा येथे मतदान आहे तरी सर्व मतदारांनी मतदान करावे.

यावेळी माजी जिल्हा हिवताप अधिकारी व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आप्पाराव पोले, गंगाधर गन्लेवार, अशोक देशमाने, रमेश चाटे, स्वप्निल मुस्तापुरे, सहाय्यक अधिक्षक ज्ञानेश्वर बगाडे, प्र.आरोग्य पर्यवेक्षक बालाजी कल्हाळे, देवानंद बोधगिरे, सुधाकर मोरे, शेळके, आरोग्य कर्मचारी माधव इटकापल्ले, हनमंत घोरबांड, दिलीप हंगरगे, विवेक राऊत, शिवाजी काळे, लक्ष्मण निलेवाड, आनंत धुळशेट्टे, विठ्ठल जाधव, वाहन चालक अशोक दुरपडे आदि उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version