
उस्माननगर। कलंबर ( बु .)ता. लोहा येथील श्री संत अगडंमबुवा यात्रा व दिवाळी निमित्त गावात आलेल्या शुरविर , व विविध ठिकाणी देशसेवा करणाऱ्या अधिकारी, सैनिकांचा , भुमिपूत्रांचा सन्मान गौरव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नामदेव तारु यांच्या संकल्पनेतून करण्यात आल्याने गावकऱ्यांनी सत्कार केला.
यावेळी या कार्यक्रमांचे उध्दघाटन पोलीस पाटील विश्वनाथ पाटील भोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मारोती कोटेवाड हे होते. आणि प्रमुख पाहुणे म्हणून उस्माननगर पोलीस स्टेशनचे सपोनि शिवप्रकाश मुळे , पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथील सपोनि अमोल गुंडे , सरपंच सौ. विमलबाई मन्नसिह ठाकुर ,मन्नसिह ठाकुर ,बळी पाटील भोकरे ( म.गां. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ) डॉ. राजू मुक्कनवार ,अरूणसिंह कच्छवा ,माजी सैनिक , डॉ. सुधाकर , पिंठू मरमठ यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक , कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम श्री संत अगडंमबुवा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर पहिली ते दहावीपर्यंत शिकलेल्या मित्रपरिवार यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.त्यानंतर गावातील तरुण देशाची सेवा करणाऱ्या भूमिपूत्रांचा गौरव उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी डॉ.आर.जी. मुक्कनवार यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. दिवाळी व श्री संत अगडंमबुवा यात्रा निमित्ताने एकत्र आलेल्या गावातील पोलीस ,शिक्षक , सैनिक ,व विविध ठिकाणी सेवा करणाऱ्या भूमिपूत्रांचा गौरव केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार नामदेव तारु यांच्या कार्याची प्रशंसा व संकल्पनेचे कौतुक करून अभिनंदन केले.
प्रत्येक नागरिकांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली पाहिजे.शिक्षणातून समाजाला अंधारातून प्रकाशाकडे वाट दाखवली जाते.असे प्रतिपादन सपोनि शिवप्रकाश मुळे यांनी केले.यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक , सामाजिक कार्यकर्ते,माजी,आजी सैनिक, कर्मचारी , उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीकांत मुक्कनवार ,तेलंग यांनी केले.तर आभार प्रदर्शन डि.के. यांनी मानले.
