नांदेड| एकांकिका…पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमी कमी स्थान असते. त्यांच्यावर पुरुषी सत्ता आपल वर्चस्व गाजवत असते. परंतु स्त्रीने ठरवलं तर ती या सगळ्या बाबीवर मात करून आपल्या मनातील भीती दूर करू शकते. गोरगरीब वंचित, भिक मागून आपली उपजिविका भागविणाऱ्या कुटुंबाची स्वप्ने किती साधी असतात. दोन वेळेचे जेवण, कपडे, मुलाच बारस, शिक्षण, नोकरी, अशा प्रकारचे आशय एकांकिका मधून सादर करण्यात आले.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सध्याचा तरुण भौतिक सुखात व्यस्त झाला असून माणसा माणसांमधील संवाद कुठेतरी कमी होत चालला आहे. सध्याच्या या परिस्थितीमुळे मानसिक स्वास्थ्य कमकुवत होऊन नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. साप चावल्यामळे माणसाचा मृत्यू होत नसून त्याच्या मनातील भीतीमुळे मृत्यू होत असतो. साप उतरवणे किंवा चढवणे या सगळ्या भूलथापांना बळी पडत असलेल्या ग्रामीण भागातील नवीन पिढीकरिता शिकवण या एकांकिकेच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. तरुणांनी शिक्षणाची कास धरून मोठे व्हावे, व अशा प्रथामध्ये अडकून आपले व समाजाचे भविष्य अंधारात नेऊ नये.

एकांकिका या प्रकारात एकूण संघांची नोंदणी झाली पैकी 6सादर झालेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कॅम्पस नांदेड संदेश :- कलावंताच्या भावभावना, कलावंताच्या आयुष्यात होणारी घुसमट, कलावंताच्या समाज आणि शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा, परिपूर्ण कलावंत होण्याच्या
सिद्धांत दिग्रस्कर, टिया परदेशी ,इशा बांगडे ,साक्षी शिंगणे ,कावेरी कौसडीकर ,प्रतीक इंगोले ,गौरी चौधरी ,सुदर्शन चिंतोरे, ग्रामीण महाविद्यालय नांदेड संदेश :- मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेला युवक, समस्यांच्या विळख्यात सापडलेला युवक, बेरोजगार युवक , नम्रता भगत, प्रेम व नलवाढ , वैशाली शिलार अक्षता शिंदे, वैभव सौदागर, अतुल राक्षसे या कलावंतांनी सहभाग घेतला.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version