
नांदेड। रात्रीचे वेळी फिर्यादीस रस्त्यात आडवुन त्याचे जवळील मोबाईल व सोण्याचे दागीणे लुटनारा एक आरोपीला मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. या कार्यवाही बद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून पोलिसांचे आभार मानले जाते आहेत.
दिनांक 30/03/2024 रोजी रात्री 11.30 वाजता फिर्यादी हा पुजा बार लातुर फाटा येथुन राज अपार्मेंट कडे पाई जात असतांना आदित्य हॉटेलच्या समोर त्यास आरोपीने मोटार सायकल फिर्यादीचा हात पिरगाळुन त्याचे जवळील मोबाईल व सोण्याचे दागीने जबरीने चोरुन नेले वरुन पो.स्टे. नांदेड ग्रामीन येथे गुरन 267/2024 कलम 394,506,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयाच्या आरोपीचे शोध करण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी स्थानीक गुन्हे . शाखा नांदेड यांना दिले होते. त्यावरुन स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध करण्यासाठी पोउपनि बिचेवार यांची एक टिम नेमण्यात आली होती. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी गोपनीय माहीतीगार यांचे कडुन माहीती घेवुन आरोपी नामे बालाजी विजय यमजलवाड वय 18 वर्षे रा. संभाजीचौक सिडको नांदेड यास ताब्यात घेवुन त्यास गुन्हया बाबत विचारपुस केली असता त्याने व त्याचा मित्र नामे अक्षय बालाजी पवार रा. स्मशानभुमी सिडको नांदेड असे दोघांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व त्याचे ताब्यातुन गुन्हयातील गेला माल दोन मोबाईल किमती 76,000/- रुपये व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण 1,06,000/- रुपयाचा मुद्देमाल त्याचे कडुन जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर. पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि श्री आनंद बिचेवार, पोलीस अमलदार गंगाधर कदम, सुरेश घुगे, मोतीराम पवार, तानाजी येळगे, महेश बडगु, किशन मुळे, मारोती मोरे, गजानन बयनवाड चालक मारोती मुंडे सायबर सेलचे पोउपनि श्री गंगाप्रसाद दळवी, पोलीस अमलदार राजेश सिटीकर, दिपक ओढणे यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.
