श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेची तयारी अंतिम टप्प्यात; श्रीराम जन्मोत्सव समितीची पत्रकार परिषदेत माहिती

नांदेड। दरवर्षीप्रमाणे या वर्षीही श्रीराम जन्मोत्सव भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध देखावे भाविक व शहरवासीयांचे लक्ष वेधणार असून या शोभायात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अयोध्या येथील श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिकृती असणार असल्याची माहिती श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी देण्यात आली.
श्रीराम जयंती निमित्त 17 एप्रिल रोजी शहरात भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी शोभायात्रा 17 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी राम घाट येथील श्रीराम मंदिरात आरती झाल्यानंतर सदर गाडीपुरा येथील हनुमान मंदिरात येणार आहे, त्यानंतर गाडीपुरा येथील श्री रेणुका माता मंदिरापासून दुपारी 12 वाजता मुख्य शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.या शोभायात्रेत भोलेनाथाची 12 फुटाची मूर्ती राहणार असून 14 फूट श्रीरामाच्या मूर्तीचा समावेश राहणार आहे. तसेच अयोध्या येथील रामललाच्या 5 फूट मूर्तीची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्याशिवाय विविध देखावे राहणार असून या शोभायात्रेच्या माध्यमातून मतदान जनजागृती करणाऱ्या देखाव्याचाही समावेश आहे.
सदर शोभायात्रा 17 एप्रिल रोजी गाडीपुरा येथील रेणुका माता मंदिरापासून दुपारी 12 वाजता निघणार असून ती जुना मोंढा,महावीर चौक,वजीराबाद चौक ,शिवाजीनगर, आयटीआय चौक,वर्क शॉप कॉर्नर मार्गे अशोकनगर येथील श्रीराम मंदिरात पोहचणार असल्याची माहिती श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. संतोष ओझा, डॉ. रमेश नारलावार, गणेशसिंह ठाकुर, उदयसिंह बिसेन,मोहन पाटिल,किशोर वागदरीकर,वीरेंद्रसिंह परिहार,विजयसिंह गोर,रविसिंह,रविसिंह रघुवंशी,गणेशसिंह परिहार,अंगदसिंह परदेसी, सुरेंद्रसिंह विदेह, नरेशसिंह राठौर,तुलजेश कुरील, साईसिंह ठाकुर,कैलाश यादव,
