हिमायतनगर तहसीलच्या देखरेखीत होत असलेल्या कारभाराला लगाम लावावा – गणेश शिंदे यांची पाणी टंचाई आढावा बैठकीत मागणी
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही महिन्याभरापासून नदी-नाल्याच्या काठावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करून बांधकाम धारक गरजूना अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. हा सर्व प्रकार महसुलच्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना माहित असताना देखील हप्ते देणाऱ्या रेती माफियासाठी रान मोकळे सोडले जात आहे. त्यामुळे रेतीघाटचे लिलाव घेण्यास समोर कोणीच येत नाही, एवहडच नाहीतर तालुक्यात तलाठी मंडळी अधिकारी यांच्या भ्रष्ट नितीमुळे फेरफारसह अन्य कोणत्याही कामासाठी पाच ते सहा आकडी रक्कम दिल्याशिवाय साधा फेरफार देखील केला जात नाही असा गौप्यस्फोट करून तलाठ्याच्या कारभारावर आमदार माधवराव पाटील जवळगावकर, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार गायकवाड यांच्या उपस्थितीत गणेश शिंदे अंडी प्रल्हाद पाटील टेम्भूर्णीकर यांनी सवाल उपस्थित केला आहे. यांच्यावर कोण लक्ष देणार आणि शेजारी गोरगरिबांची होणारी पिळवणूक कोण थांबविणार ..? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याकडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लक्ष देऊन हिमायतनगर तहसीलच्या देखरेखीत होत असलेल्या कारभाराला लागाम लावावा अशी रास्ता मागणी आता पर्यावरण प्रेमी नागरीक, वाळूदादाकडून होणाऱ्या लूटीला बाली पडणारे गरीब घरकुलधारक व सर्वसामान्य नागरीकातून पुढे येत आहे.
हिमायतनगर – उमरखेड तालुक्याच्या काठावरून पैनगंगा नदी वाहते आहे. या नदीमध्ये हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातून अनेक मोठे नाले वाहत येऊन मिसळणारे आहेत. त्या नाल्यातून आणि पाणी असलेल्या पैनगंगा नदीच्या पत्रातून कोणताही अधिकृत परवाना नसताना एकही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना ग्रामीण भागातील बेरोजगार युवक आणि काही बिहारी मजुराच्या सहाय्याने राजकीय वरदहस्त असलेल्या वाळू दादांनी रेती व मुरुमाच्या गौणखनिजाचा रात्रंदिवस उपसा सुरु केला आहे. तालुक्यातील डोल्हारी, पळसपूर, सिरपल्ली, एकंबा, मंगरूळ, गांजेगाव बंधारा, कोठा, कोठा तांडा, कामारी, लाखाडी नदी, पिंपरी, विरसनी, दिघी, खडकी, टाकाराळा, धानोरा, बोरगडी, वारंगटाकळी, विरसनी, बारसं जवळील म्हसोबा नाला आदीसह अन्य रेती घाटावरून चोरीच्या मार्गाने रेती काढली जात आहे.
या गंभीर बाबीकडे महसूल प्रशासनाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे पाहावयास मिळते आहे. त्यामुळे रेतीची वाहतूक करणारे निर्ढावले असून, थंडीच्या लाटेचा फायदा घेत रेतीचा उपसा व स्टोक करण्यावर अधिक भर दिल्याचे पंचायत समितीच्या पाणी टंचाई आराखडा बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या तलाठ्यांच्या कार्यशालीवरून उघड झाला आहे. तर गरजूना रात्रीतून रेती टाकून दिवसा अव्वाच्या सव्वा रेतीचा मोबदला घेतला जात आहे. यासाठी महसुलाचे अधिकारी कर्मचारी व पोलिसांना देखील महिनेवारी हप्ता देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
मागल्या दोन वर्षांपासून हिमायतनगर तालुक्यात रेतीघाटचे लिलाव झाले नाही, शासनाने आणखीन रेटीडेपो सुरु केला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या बांधकाम, रस्ते यासाठी रेती आवश्यक असल्याने वाळू दादांच्या गोरखधंद्याला ऊत आला आहे. रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाईनपर्वानं ट्रैक्टर, टिप्पर, यासह इतर वाहनाने रेतीची विनापरवाना वाहतूक होते आहे. हिमायतनगर शहर व ग्रामदिन भागात रस्त्यावरील सीसीटीव्ही कैमेऱ्याचे फुटेज तपासल्यास हा सर्व प्रकार दिसून येणार आहे. एखाद्याने तर्र केल्यास सदरील वाहने पकडून तडजोडीने वाहने सोडून दिली जात असल्याची माहिती एका रेतीचा धंदा करणाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. यावरून हिमायतनगर तहसील प्रशासनाचा कारभार केवळ बोटचेपी पद्धतीने चालतो कि काय…? अशी शंका येऊ लागली आहे.
यावर्षी तर दिवाळी नंतर सुरु झालेल्या रेतीचा गोरखधंदा पाहता यंदा तरी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभंजित राऊत साहेब याकडे लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्यात रेतीच्या चोरीमुळे शासनाचा महसूल बुडणार नाही यासाठी कठोर पाऊले उचलून तालुक्याचा कारभार पाहणारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना कार्यवाहीचे आदेश देऊन, पैनगंगा नदीकाठावरील सर्वच रेती घाटाचे रितशीर लिलाव करतील का..? याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. जर रेती घाटाचा लिलाव झाला तर गरजूना अल्प दरात रेती उपलब्ध होईल तसेच शासनाने सांगितलेल्या रेटीडेपो सुरु झाला तरी देखील अल्प दारात रेती उपलब्ध होऊन रखडलेल्या गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होतील. अन्यथा भविष्यात नदीकाठावरील जनतेला तीव्र पाणी टंचाईच्या समस्येबरोबर घरकुलाचे स्वप्न अधांतरित राहण्याची वेळ येईल यात शंका नाही.