जिल्हाधिकारी राऊत यांच्यामुळे लोहा शहरातील ३५ हजार जनतेला व लगतच्या नऊ गावांना “पाणी “मिळाले
लोहा| शहरा समोर भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती . दोन महिन्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार अशी परिस्थिती उदभवली असतानाच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत याच्या निर्णयामुळे लोहा शहरातील ३५ हजाराहून अधिक नागरिकांना तसेच तलावातून नऊ गावांसाठी पाणीपुरवठा केला जाती त्या गावांना “पाणी ” मिळाले त्यामुळे शासनाचे टँकर व अधिग्रहण यावरील लाखो रुपयांचा खर्च वाचला..रखरखत्या उन्हात नदीपात्रातून खळखळ पाणी वाहत असून ते सुनेगाव तलावात साठवण होत आहे. नगर पालिका प्रशासक उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार , मुख्याधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर यानी निवडणूकीच्या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढत पाण्यासाठी पाठपुराव्या केला आणि शहराची समस्या सुटली
लोहा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावात यंदा जेमतेम पाणीसाठा होता.त्यावेळी नगराध्यक्ष कार्यरत होत्व दिवाळीत शहरातील संभाव्य पाणी टंचाईवर उपयोजना कार्यासाठी सतेचा “मुकुट ” परिधान करणाऱ्यांनी “६७ कोटी रुपयांच्या ऊर्ध्व मानार “प्रकल्पावरून पाणी पुरवठा निविदा जादा दराने सुटावी व लोक वाटा भरताना नगर पालिकेने कर्ज काढावे.
यासाठी सत्ताधारी कारभारी परेशान होते .शिवाय ” कमिशन “साठी ओढाताण सुरू होती आणि त्यात पाणी समस्या निवारणाकडे कोणीच लक्षच दिले नाही. देव तारी ..त्याला कोण मारी” असे असले तरी प्रशासक तारी ..त्याला कोण मारी ..हे लोहावासीयाना लागू पडले .प्रशासक उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार , मुख्याधिकारीव तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी पदभार स्वीकारतात शहराच्या पाणी समस्ये बाबत नगर अभियंता शरद राहेरकर याच्याशी सविस्तर चर्चा केली.संभाव्य पाणी टंचाई आराखडा सुद्धा सादर केला नसल्याचे मुख्याधिकारी याच्या निदर्शनास आले .नगर पालिकेतील कामकाजातील ढिसाळपणा उजागर झाल्या नंतर त्यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांना खडसावले.काही कर्मचारी “सत्ताधारी कारभाऱ्याच्या ” प्रभावा खालीच वावरत होते.हे सगळे सरळ झाले.
प्रशासक व मुख्याधिकारी यांनी ऊर्ध्व मानार प्रकल्पाच्या उपअभियंता याच्याशी चर्चा केली .त्यानंतर नगर पालिका पाणी पुरवठा प्रभार असलेले अभियंता शरद राहेरकर याना प्रत्यक्ष धरणाची “ऑन दि स्पॉट” पाहणी अहवाल सादर करण्याचे सांगितले त्यानंतर उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार परळीकर , यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत याना लोहा शहराच्या पाणी टंचाई व ऊर्ध्व मानार धरणातील पाणी स्थिती बाबत माहिती दिली.जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद व लिंबोटी धरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व पाणी सोडण्याचे निर्देश दिले पण कॅनॉल व नदीपात्र निर्मळ करावे असा सूचना नगर परिषद प्रशासनास दिल्या.
अभियंता राहेरकर यांनी नदीपात्र व कॅनॉल स्वच्छ केले. तत्कालीन अभियंता अशोक पाटील याच्या काळात नदी सरळीकरण झाले होते ते आता झाले .याच काळात निसर्ग धावून आला दोन वेळा बेमोसमी पाऊस झाला .आणि लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात पाणी आले.जिल्हा प्रशासन निवडणूक प्रक्रियेत व्यस्थ असतानाही त्यातून वेळ काढत जिल्हाधिकारी यांनी
लोह्यातील ३५ हजार नागरिकांची व लगतच्या नऊ गावातील भीषण पाणी टंचाई निवारण केले त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा टँकर व अधिग्रह खर्च बचत झाला. हे केवळ आणि केवळ जिल्हाधिकारी राऊत यांच्यामुळेच घडले अन्यथा शहरात “पाणीबाणी”निर्माण झाली असती यासाठी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार तहसीलदार मुख्याधिकारी विठ्ठल परळीकर याचे प्रयत्न यशस्वी झाले.पाणी चोरी होऊ नये म्हणून ३२ कर्मचाऱ्याचा खडा पहारा पाणी मार्गावर दिला सत्ताधारी कारभारी असते. आचारसंहिता कारण पुढे करत शहरवासीयांना पाणी टंचाईच्या खाईत लोटले असते पण तहसीलदार व उपजिल्हाधिकारी याच्या पाठपुराव्यामुळेच शहराला पाणी मिळाले आणि तलावातून ज्या नऊ गावाला पाणी पुरवठा होत आहे त्या गावनाही दिलासा मिळाला.
लिंबोटी धरण धावून आले
स्व विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तत्कालीन आमदार। प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पाठपुरावा करत रखडलेला ऊर्ध्व मानार प्रकल्प (लिंबोटी धरण) पूर्ण करून घेतले. त्यामुळे लोहा कंधार तालुक्यात नऊ हजार हेक्टर हून अधिक शेती सिंचना खाली आले तर रखरखत्या उन्हात खळखळ पाणी वाहत आहे .लोहा शहराच्या भीषण पाणी टंचाई ला हेच धरण धावून आले आहे.