वाळकी बाजार येथील जाग्रत देवस्थान असलेल्या माता इसाई देवीच्या यात्रेला प्रारंभ

हदगाव। तालुक्यातील वाळकी बाजार येथील जाग्रत देवस्थान आसलेले माता इसाई देवीच्या दहा दिवसाच्या यात्रेला आज दि.२२ एप्रिल पासुन नुकतेच प्रांरभ झाला आसुन, माता इसाई देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी महाराष्ट्र व आध्राप्रदेश राज्य भरातुन भाविक भक्त मोठ्या संख्येने ययेत असल्याची माहीती पुजारी परसराम टोपाजी गायकवाड यांनी दिली आहे.
हदगाव हिमायतनगर रोडवर आसलेल्या वाळकी बाजार या गावात दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी माता इसाई देवीच्या यात्रेच्या निमित्त अखंंड हरिनाम सप्ताहा उत्साहाला आज पासुन सुरवात झाली आहे. आज दि.२३/०४/२००२४ रोजी हनुमान जयंतीच्या चैत्र पौर्णिमा या दिवशी रात्री १२ वा. सुमारास देविचा जय घोष करित छबिना निघतो या छबिनात भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात गर्दि असते.विशेषता इसाई देवी माता ही चुलीमध्ये मुर्ती असुन हे निद्र आवस्थमध्ये आहे.व या मंदीराची निर्मिती निच्छित काही सांगता येत नाही.
देवीचे मंदीर हे चिरेबंदी व हेमाडपंती आसुन या ठिकाणी देवीच्या मुख्य प्रवेशव्दारा समोर एक छोट दिपमाळ व दोन भवे आशा चिरबंदी दिपमाळ आहेत. त्या ठिकाणी भाविक भक्त आपली मनपुर्वक कामना झाल्याने त्या दिपमाळीमध्ये मोठ्या श्रंध्देने तेल टाकुन आपली भावना पुर्ण करत आसल्याचे येथील पुजारी परसराम टोपाजी गायकवाड, व सुभाष लक्ष्मण गायकवाड यांनी माहीती सागितली आहे. दरवर्षी दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात.
