क्रीडानांदेड

महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन पारंपारीक खेळ सादर करण्‍याची खेळाडूंना संधी

नांदेड|“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवाय्यांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दि. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय “महासंस्कृती महोत्सवाचे” आयोजन करण्याचे महाराष्‍ट्र शासनाचे निर्देश आहेत.

त्‍याअनुषंगाने नांदेड जिल्‍हामध्‍ये जिल्हा प्रशासन नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 व 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पोलीस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे महासंस्‍कृतीक महोत्‍सव अंतर्गत शिवकालीन पारंपारीक खेळाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्ये  खो-खो व कबड्डी या खेळामध्ये सन 2023-24 या वर्षातील शालेय तालुकास्तरावर 19 वर्षाआतील मुले-मुली संघनी प्रथम क्रमांक संपादन केलेल्या संघास संधी देण्यात येणार आहे.  कुस्ती या खेळप्रकाराकरीता 19 वर्षाआतील मुले-मुली खेळाडूंना आपली नावे नोंदविता येतील व आटयापटया, लेझीम, लाठीकाठी, रस्सीखेच, गतका, लगोरी व मल्लखांब (पुरुष व महिला खुला गट) या खेळाचा समावेश यात करण्यात आला आहे. या क्रीडा प्रकारात पारंगत असणाऱ्या जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत विहित नमुन्यातील फॉम भरुन खेळाडूची/संघाची प्रवेशिका ई-मेल आयडी dsonanded@rediffmail.com यावर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड येथे प्रत्यक्ष सादर करावेत.

या कालावधी नंतर प्राप्‍त प्रवेश अर्जाची छाणणी होऊन समितीद्वारे अंतिम करण्‍यात येवून, निवडक खेळाडूं/ संघास “महासंस्‍कृती महोत्‍सवात” सहभाग घेता येईल. वैयक्तिक व सांघीक खेळ प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन करणा-या खेळाडू / संघास रोख पारीतोषीक व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते पुरुष व महिला गटात स्वतंत्र देण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे महासंस्कृती महोत्सव समिती नांदेडच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!