नांदेड

वृक्षमित्र आपण सारे कनिष्क नगरी वाघाळा येथे आयुक्त डॉ.डोईफोडे यांच्या हस्ते आज वृक्षलागवड कार्यक्रम

नवीन नांदेडl नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका, गुरुद्वारा लंगर साहिब, नांदेड वृक्षमित्र फाऊंडेशन, नांदेड कनिष्क नगरी गृहनिर्माण संस्था,वाघाळा नांदेड आयो जित हरित नांदेड अभियान -2024वृक्षलागवड कार्यक्रम आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

मनपा नांदेड हद्दीत शहरातील वाढत्या तापमानास नियंत्रित करण्यासाठी,नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा तसेच भावी पिढीच्या भविष्यासाठी कनिष्क नगरी वाघाळा नांदेड येथे लोक सहभागातून ट्रि-गार्डसह वृक्षांची लागवड व संगोपन रविवार, दि. 21 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता कनिष्क नगरी गृहनिर्माण संस्था वाघाळा येथे ट्री-गार्ड सह मोठ्या वृक्षांची लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास सर्व संस्था प्रतिनिधी,पर्यावरण जागरुक महिलानागरीक,विद्यार्थी,वृक्षमित्र,निसर्गप्रेमी,प्लॉगर्स,जलदूत यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहुन सहभाग घ्यावा असे आवाहन संभाजी कास्टेवाड सहायक आयुक्त, सिडको क्षेत्रीय कार्यालय,दयानंद गायकवाड, अध्यक्ष, कनिष्क गृ.नि.सो. वाघाळा, नांदेड.दयानंद जोंधंळे सचिव व संचालक मंडळ पदाधिकारी कनिष्क गृ.नि.सो. वाघाळा यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!