करियरनांदेड

हिमायतनगरचे जेष्ठ नागरिक विठ्ठल बळीराम फुलके याना संत गाडगेबाबा राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर

हिमायतनगर| वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने दिल्या जाणारा संत गाडगेबाबा राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन २०२३-२४ करीता हिमायतनगर येथील गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बळीराम फुलके, ता हिमायतनगर जी. नांदेड यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार दि फेब्रुवारी रोजी देण्यात येणार असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय समाजसेवक पुरस्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. फुलके याना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दशरथ हेंद्रे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे. 

विठ्ठलराव फुलके यांनी केलेल्या अभिनव कार्याची दखल घेत यावर्षाचा राष्ट्रीय पुरस्कार विशेष गौरव पुरस्कार 2023-24 करीता निवड करण्यात आली असल्याचे पत्र दिले आहे. राष्ट्रीय विशेष गौरव पुरस्कार 2023-24 चा गौरव सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचा हस्ते एका भरगचहा विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ केंद्रीय प्रचार विभाग, गुरुकुंज आश्रम मोझरी जि. अमरावती मंडळची अधिकृत शाखा गुरुदेव सेवा मंडळ, सटाणा ता. बागलाण जि. नाशिक यांच्या तर्फे हा पुरस्कार देण्यात येणार असे. असे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पुंडलीक देसले, तालुका उपाध्यक्ष सौ. शीतल केदू देसले गुरुजी, श्रीगुरुदेव सेवा मंडळ, सटाणा जि. नाशिक यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!