मुदखेड तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवरच लावले किडनी विकणे असल्याचे पोस्टर
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवरच ‘किडनी विकणे आहे’ असे पोस्टर लावले असून, यासाठी संपर्क क्रमांक लिहिला आहे. या पोस्टरवरून एकच खळबळ उडाली असून, सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याची वेळ एका शेतकरी कुटुंबावर आल्याचे विदारक चित्र नांदेड जिल्ह्यात समोर आले आहे.
अतिवृष्टी, नापिकी आणि सावकारी कर्जाच्या पाशात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवरच ‘किडनी विकणे आहे’ असे पोस्टर लावले असून, यासाठी संपर्क क्रमांक लिहिला आहे. या पोस्टरवर ‘पाच किडन्या विकणे आहे’ अशा आशयाचा मजकूर लिहिलेला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या हलाखीचे वास्तव समोर आले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील वाईवरदड येथील महिला शेतकरी सत्यभामा बालाजी कुंचलवार यांनी हे पोस्टर लावले आहे. त्यांच्या कुटुंबात पती, दोन मुले व एक मुलगी असे पाच सदस्य आहेत. त्यांना सावकाराकडून त्रास दिला जात असून त्यांनी गाव सोडून दिले आहे.
यापूर्वी त्या शेती करून फुलाचे उत्पादन घेत होय. कोरोना काळामुळे आमच्याजवळील सर्व काही संपल्याने सावकाराकडून कर्ज घेतले होते. कॉर्नचे नियम शिथिल झाल्यानंतर पुन्हा फुलशेती करून कर्ज चुकते करता जवळपास २ लक्ष दिले होते. मात्र सावकारीचा फास असा आवळला गेला होता कि, सावकार नेहमी पैसे मागतच होता. काय करावे असा विचार केला आणि शेती इतरांना करण्यास दिली. तर त्या लोकांनाही सावकाराकडून त्रास दिला जात आहे.
दरम्यानच्या काळात त्यांच्या एका मुलाला सर्पदंश झाला होता. त्यांनी मुंबईत त्याच्यावर उपचार केले. याच ठिकाणी मोलमजुरी करून पोट भरत असून, सत्यभामा या लोकांच्या घरी धुणीभांडी करत आहेत. सावकाराचे पैसे चुकते करायचे आहेत. यामुळे आम्ही किडनी विकण्याचं पोस्टर लावून यातून मिळणाऱ्या पैश्याने सावकाराचे कर्ज चुकते करण्यासाठी आमची हि धडपड असल्याचे दिसते आहे. एकूणच सावकाराचे नाव समोर आले नसले तरी नांदेड जिल्ह्यात सावकाराच्या कर्जापायी एक शेतकरी कुउंब उध्वस्त होत असल्याचे या घटनेवरून दिसते आहे. एकूणच सदरील किडनी विकणे आहे हे पोस्टर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटजवळील एका भिंतीवर लावलेले असल्याने प्रशासन याची काहीतरी दाखल घेईल का..? याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.