नवीन नांदेड। राष्ट्रीय प्राधिकरण राज्य महामार्ग वर नांदेड लातूर मार्गावरील वसरणी रहीमपुर खुर्द गट नंबर एक जागेचा मावेजा उपलब्ध असतांना देखील वाढीव मोबदला. मिळावा यासाठी न्यायालयात दाखल केलेली याचींका फेटाळल्याने रहीमपुर खुर्द गट नंबर एक मधील जिल्हा प्रशासन, रस्ते विकास मंडळ, संबधित गुतेदार व पोलीस प्रशासनाच्या उपस्थित गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या व महामार्गास अडचणी येणारा तिन ईमारत व दुतर्फा असलेली घरे आज १८ डिसेंबर रोजी जेसीबी यांच्या साहाय्याने पाडण्यात येऊन दुतर्फा असलेली झाडी तोडण्यात आली आहेत, यावेळी संबधित याचीकाकर्ते यांनी प्रशासनाने कोणत्याही लेखी सूचना दिली नसल्याचे सांगितले, यामुळे आमचे नुकसान झाल्याचे सांगितले.
राष्ट्रीय प्राधिकरण राज्य महामार्ग वरील राजरस्ता ३६१ क्रमांक नांदेड ते लातुर मार्ग वरील काम गेल्या अनेक वर्षांपासून चालू असुन हा रस्ता वाजेगाव बायपास धनेगाव मार्ग दुध डेअरी वसरणी मार्ग लातूर फाटा विष्णुपूरी जात असून २००८ मध्ये जागेचे भुसपांदन प्रकिया पडली होती परंतु काही जागा मालकांनी मोबदला कमी मिळत असल्याने यांचीका न्यायालयात दाखल केल्यांनी हा रस्ता वसरणी रहीमपुर जवळ गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता,या बाबत संबंधित याचीका कर्ते यांनी न्यायालयात धाव घेऊन वाढीव मावेजा मिळण्यासाठी मागणी केली होती.
या संदर्भात संबधीताची याचीका न्यायालयाने फेटाळल्या नंतर तात्काळ जिल्हा प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी विकास माने, रस्ता विकास मंडळाचे संबंधित अधिकारी, यांच्या सह ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, सचिन गढवे, उपनिरीक्षक चव्हाण, ईतवारा इतवारा पोलीस स्टेशनचे 2 अधिकारी 20 पोलीस अंमलदार ग्रामीणचे 3 अधिकारी 26 पोलीस अंमलदार एन एच ऐ एल चे अधिकारी, 6 जेसीबी व ट्रक्टर व केटी कंट्रक्शन अधिकारी,अंभियंता असे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे लवकरच हा रस्ता तयार होणार असून तुरत सिडकोतुन जाणाऱी येणारी वाहने काही दिवसानंतर सरळ जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अतिक्रमण काढतांना दुतर्फा मोठया प्रमाणात नागरीकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.