बैल गाडीच्या धडकेत एकाचा मुत्यु; तर बैल जोडी जखमी

हिमायतनगर| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील भोकर – हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे करंजी पाटी जवळ बैल गाडी व मोटार सायकल याच्या समोरासमोर आपघात झाला. या अपघातात मोटार सायकल स्वार युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघातानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
भोकर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या करंजी पाटी जवळ बैल गाडी व मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. त्या आपघात मध्ये मोटर सायकल चालकांचा जागीच मुत्यु झाला. मयत व्यक्ती सचिन नंदकिशोर कमटलवार रा भोकर जि नांदेड गाडी मोटार सायकल क्रमाने MH26BF 1191 असुन, भोकर येथील प्रसिद्ध व्यापारी होता.
त्याच्याकडे विविध कंपन्याचे काम असल्यामुळे ते हीमायतनगर तालुक्यात आले होते अशी माहिती त्याच्या नातेवाईक याच्याकडून देण्यात आली आहे. हिमायतनगर येथुन व्यापार्याच्या भेटी घेउन सायकाळी ठिक 6 ते 7 वाजेच्या दरम्यान तो दुचाकीवरून भोकरच्या दिशेने जात होता. तेवढ्यात रोजच्या प्रमाणे शेती कामे आटोपून गावाकडे परतणारे शेतकरी रामु तालेवर रा करंजी हा शेतकरी बैलगाडी घेऊन गावडे येत होता. आच्यानक मोटर सायकल बैल गाडीवर धडकली आणि त्यात दुचाकी चालकाचा जागीच मुत्यु झाला. घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत दुचाकीस्वार पडल्याने अतिरक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील मयत व्यापारी युवक हा अगोदरच व्याधिग्रस्त होता, मयत सचिन यांच्या दनही यद्न्य निकामी झाल्यानंतर आई व पत्नीने त्यास किडन्या दान करून त्यास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. मात्र नियमातील हे मान्य झाले नाही आणि बैलगाडी आणि दुचाकीच्या पडतात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
