किवळा येथील कुस्ती दंगलमध्ये अनेक नामवंत पहेलवांनाचा सहभाग, शेवटची कुस्ती अच्युत टरके यांनी तिसऱ्यादा जिंकली

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नवीन नांदेड। किवळा ता. लोहा येथील हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा ऊरस शरीफ निमित्ताने आयोजित कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्रातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला, या मानाच्या कुस्तीची सुरूवात रूद्रगिर गुरूदयाळगिरी महाराज व माजी सभापती आंनद पाटील शिंदे,माजी सभापती शंकर पाटील ढगे साईनाथ पाटील टरके,व मान्यवरांच्या,गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली, यावेळी झालेल्या शेवटच्या कुस्ती मध्ये यावर्षी किवळा येथील अच्युत टरके यांनी जिकुंन हॅट्रीक साधली यावेळी मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त केला.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३१जानेवारी रोजी हजरत शाह हुसेन मस्तान साहेब दर्गा किवळा ऊरूस शरीफ निमित्ताने रूद्रगिर गुरूदयाळगिर महाराज मठ संस्थान, ग्रामपंचायत कार्यालय, तंटामुक्त समिती, सेवा सहकारी सोसायटी व समस्त गावकरी मंडळी किवळा यांच्या वतीने कुस्ती दंगल आयोजन ३१ जानेवारी रोजी करण्यात आले होते, यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील व तालुक्यातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला होता.

पंच म्हणून निरंजन टरके, जगनाथ टरके,राजु टरके,वैभव जाधव, आझहर पठाण, यासिन पठाण,पंजाब टरके, दता नाना टरके, प्रभाकर टरके, , ,यांनी काम पाहिले, तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती लोहा सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी सभापती शंकर पाटील ढगे, सरपंच रामजी पाटील ढगे, ऊपसरपंच केशव पाटील टरके,माजी सरपंच माधवराव पाटिल टरके टाकळगाव सरपंच भिमराव लामदाडे, ग्रामपंचायत सदस्य विठलराव किवलेकर शाम अंभोरे,आंनदा गायकवाड,सुधाकरराव टाक,रविकिरण डोईफोडे, ग्रामविकास अधिकारी अमृतराव शिंदे, यांच्यासह मान्यवरांच्यी व किवळा गावातील गावकरी यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थितीत होती.
शेवटची कुस्ती सुरूवात झाल्यानंतर रोमहर्षक व थरारक होत असतांना काही मिनटातच सात हजार रुपयाची माळेगाव केसरी पहेलवान अच्युत दिगंबर टरके किवळा व मेहबूब शेख वाशीम विदर्भ, यांच्यात लढत झाली यात अच्युत दिगंबर टरके हे तिसऱ्यादा विजयी झाले.

शेख खाजा परभणी व परमेश्वर बामणी यात बरोबरीने सोडली तिसरी कुस्ती मध्ये तिन कुस्ती लावण्यात आले, शंभर ते सहा हजार रुपये पर्यंतचा अनेक कुस्ती लावण्यात आल्या होत्या.यात विविध जिल्ह्यांतील नामवंत पहेलवांनानी आखाडा गाजवुन व डावपेच आखात कुस्त्या जिंकल्या यात्रा कमेटीचे गुरूरूद्रगिर महाराज, मुस्तफा पठाण, व्यंकटी टरके, साईनाथ पाटील टरके, मुरलीधर ढगे,यांच्या सह गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. कुस्ती दंगल पाहण्यासाठी किवळा परिसरातील व लोहा कंधार नांदेड तालुक्यातील अनेकजण उपस्थित होते.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!