नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील गुंडेगाव पोलीस पाटीलपदी पांडुरंग अप्पाराव हंबर्डे यांच्यी निवड झाली त्यांच्या नियुक्ती उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केली असून नियुक्ती नंतर गावकऱ्यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.
गुंडेगाव येथील पांडुरंग हंबर्डे यांनी लेखी व तोडीं परीक्षेत पोलीस पाटील परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांचा नियुक्तीचे आदेश उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिले असून ३१ जानेवारी रोजी गावकऱ्यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले. यावेळी ऊपसरपंच सदानंद पाटील गुंडेगावकर,तंटामुक्त अध्यक्ष समाधान हंबर्डे ,जगदेव हंबर्डे, विठ्ठल हंबर्डे, संदीप हंबर्डे, दासराव हंबर्डे, भिमराव हंबर्डे, शिवहार हंबर्डे, कैलास हंबर्डे, गोविंद हंबर्डे, सतिश हंबर्डे, गजानन हंबर्डे, सुरयभान कुरे, तिरूपती कुरे, बालाजी हंबर्डे, माधव हंबर्डे, अनिल हंबर्डे, मधुकर हंबर्डे, दौलत हंबर्डे,पिंटु पाटील,शामराव हंबर्डे,यांच्या सह गावकऱ्यांनी अभिनंदन केले.
गावातील हनुमान मंदिरात झालेल्या कार्यक्रमात शाल श्रीफळ देऊन व फटाक्यांच्या आतिषबाजी व गुलाल उधळून जल्लोष व्यक्त करण्यात आला व भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.