
नांदेड| शहरातील नाव घाट येथे जुन्या नांदेड भागातील घरगुती व मंडळाचे गणपतीचे गोदावरी नदीत विसर्जन महापालिकेने मज्जाव केल्याने सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत घरगुती गणपतीचे विसर्जन थांबले होते या भागातील नागरिकांनी तात्काळ शिवसेनेचे नेते प्रकाश मारावार यांच्या कानावर सदर प्रकार टाकले. आपल्या सहकार्य सह प्रकाश मारावार यांनी नाव घाटावर आक्रमक भूमिका घेऊन ठिय्या आंदोलन चालू केले.
अखेर मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम साहेब यांनी त्या भागातील झोन अधिकारी यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेऊन गणपती विसर्जन करण्यास परवानगी दिली. सकाळपासूनच या भागातील घरगुती गणपतीचे विसर्जन थांबले असल्यामुळे अनेक भक्तगण संताप व्यक्त करत होते महापालिकेने नाव घाट येथे कोणतीच गणपती विसर्जनाची सुविधा न करता थेट गणपती संकलन एका ट्रक मध्ये करत असल्यामुळे भक्तगणामध्ये असंतोष पसरला होता इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री तांबे साहेब यांच्याही लक्षात प्रकाश मारावार यांनी आणून दिले मनपाने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौद किंवा नदीपत्रात पर्यायी व्यवस्था न करता घरगुती गणपती व मंडळाचे गणपतीचे संकलन एका ट्रक मध्ये करत होते.
यावेळी प्रकाश मारावार यांच्या नेतृत्वाखाली घरगुती गणपती व मंडळाच्या गणपतीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले वातावरण बिघडत असल्याने लक्षात येतात मनपा प्रशासन नाव घाटावर गोदावरी नदीत घरगुती गणपती मंडळाच्या गणपतीचे विसर्जनाची परवानगी दिली. यावेळी शिवसेनेचे नेते प्रकाश मारावर यांनी तीव्र संताप व्यक्त केला अशा प्रकारे जाणून-बुजून हिंदूंच्या भावना दुखण्याचा प्रयत्न होत असेल तर खपवून घेणार नाही अशी रोखठोक भूमिका यावेळी घेतली या ठिय्या आंदोलनात या भागातील सामाजिक कार्यकर्ते उमेश कोकलवार युवा सेनेचे शहर प्रमुख गजानन हरकरे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख किसन फटाले विश्व हिंदू परिषद चे महामंत्री गणेश कोकलवार सतीश मोती पवळे यांच्या सह जुन्या नांदेड भागातील अनेक घरगुती गणपती व मंडळाचे पदाधिकारी यावेळी सहभागी घेतला अखेर इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री तांबे साहेब यांच्या आरतीने गणपतीचे विसर्जनाची सुरुवात गोदावरी नदीपत्रात करण्यात आली.
