कंधार येथील घरफोडीचा गुन्हा उघड नगदी 27,50,000/- रुपयासह एक आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कारवाई

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

कंधार/ नांदेड| जिल्हयात घरफोडीचे प्रमाणात वाढ झाल्याने मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना आदेशीत करुन घरफोडया उघड करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्यावरुन पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांनी श्री पांडुरंग माने, सपोनि स्थागुशा नांदेड यांची एक टिम नेमुन नांदेड जिल्हयातील घरफोडया उघड करण्यासाठी आदेश दिले होते.

फिर्यादी नामे मोहम्मद युसुफ खान रा. कंधार यांनी दिलेल्या तक्रारीत ते हैद्राबाद येथे दवाखाण्यात गेले असता कोनीतरी अज्ञात आरोपीने त्यांचे बेडरुमचे कडीकोंडा तोडुन बेडरुम मध्ये ठेवलले 27,50,000/- रुपये चोरी केली आहे या बाबत तक्रार दिले वरुन पो.स्टे. कंधार येथे दिनांक 07/11/2023 रोजी गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी व गेल्या माला बाबत आज दिनांक 06/12/2023 रोजी श्री पांडुरंग माने, सपोनि स्थागुशा नांदेड यांची टिम कंधार येथे जावुन तपास केला असता त्यांना गुप्त बातमीदार यांचे कडुन मिळालेल्या माहीती प्रमाणे इसम नामे मोईन महेबुब जानी शेख रा. छोटी गल्ली कंधार हा यातील फिर्यादीचे घरी नेहमी येने जाने करीत होता त्यावरुन तोच सदरची चोरी केली असल्याचे संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता तो यातील फिर्यादी हे हैद्राबाद येथे दवाखाण्यात गेले होते त्याचा फायदा घेवुन मी गेल्या एका महीण्यापुर्वी फिर्यादी नामे मोहम्मद युसुफ खान यांचे बेडरुमचे कुलुप तोडुन आतील ठेवलेले रोखरक्कमेची चोरी केल्याचे सांगुन चोरी केलेली रक्कम 27,50,000/ (सत्ताविस लाख पंन्नास हजार रुपये) त्याचे ताब्यातुन जप्त केले आहेत. सदर आरोपीस व मुद्देमाल पो.स्टे. कंधार येथे हजर केला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपानि श्री लोनीकर पो.स्टे. कंधार हे करीत आहेत.

सदरची कामगीरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री डॉ. खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, श्री थोरात उप विभागीय पोलीस अधिकारी, कंधार यांचे मार्गदशनाखाली श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, श्री पांडुरंग माने, सपोनि, श्री सचीन सोनवणे, पोउपनि, पोलीस अमलदार संजय केंद्रे, गंगाधर कदम, गुंडेराव करले, देवा चव्हाण, चालक हेमंत बिचकेवार नेमणुक स्थागुशा व पो.स्टे. कंधार येथील श्री आदीत्य लोणीकर, सपोनि, महीला पोलीस अमलदार कांबळे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!