महाशिवरात्री निमित्ताने गुरू विठ्ठलनाथ महाराज देवस्थान गोपाळचावडी येथे अखंड दत्तनाम सप्ताह निमित्ताने सोहळ्याचे आयोजन

नवीन नांदेड। श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज देवस्थान तिर्थक्षेत्र गोपाळचावडी ता. जि. नांदेड दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज मंदिर देवस्थान गोपाळचावडी ता. जि. नांदेड येथे महाशिवरात्री निमित्ताने अखंड दत्तनाम सप्ताह पालखी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्री निमित्ताने कार्यक्रमाची रुपरेषा दि.४ मार्च २४ सोमवार पहाटे ५ वाजता श्री आनंदबन महाराज गुरु गंभीरबन महाराज, यांच्या हस्ते महापुजा टाकून, दत्तनाम सप्ताहास प्रारंभ व सात दिवस अखंड दत्तनाम सप्ताह सुरुवात होईल. दि. १० मार्च २४ रविवार आमावस्येच्या दिवशी दुपारी ०१.३० वाजता त्रिभुज बबुत्रा व श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज यांच्या समाधीचा महा अभिषेक, श्री समाधान महाराज यांच्या हस्ते होईल ,या कार्यक्रमास खालील प्रमुख पाहुणे दि.१० मार्च २४ रोजी दुपारी २ वाजता उपस्थित राहणार आहेत.
आमदार मोहनअण्णा हंबर्डे (आमदार, नांदेड दक्षिण मतदार संघ) ,गंगाप्रसाद धोंडीबा काकडे (सदस्य, जिल्हा परिषद नांदेड),
मनोहर पाटील शिंदे (सदस्य, जिल्हा परिषद नांदेड), विनय पाटील गिरडे (माजी उपमहापौर ना.वा.म.न.पा.) संजय शिवाजीराव पा. घोगरे स (नगरसेवक, प्रतिनिधी ना.वा.म.न.पा.) श्रीमती गिरजाबाई तुळशीराम डाकोरे (सरपंच, गोपाळचावडी), साहेबराव बालाजी पा. सेलुकर (माजी सरपंच विद्यमान उपसरपंच, गोपाळचावडी) हे राहणार आहेत. दुपारी ३.वाजता महाप्रसाद रात्री ठीक ७वाजता गुरु विठ्ठलनाथ महाराज यांच्या पादुका पालखी सोहळा ,पालखी सोबत श्री दत्त भजनी मंडळ, गोपाळचावडी गावातील प्रमुख रस्त्याने निघेल व सांगता गुरु विठ्ठलनाथ महाराज देवस्थान येथे येईल.
रात्री ८ वाजता दोन भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. दत्तकृपा भजनी मंडळ ब्राम्हणवाडा ता.जि.नांदेड, द.भ.प. आनंदराव राजेमोड,श्री सद्गुरु कृपा भजनी मंडळ बितनाळ ता. उमरी जि. नांदेड, द.भ.प. आनंदराव बकेवाड यांच्या मध्ये होईल, ११ मार्च २४ रोजी सोमवारी पहाटे ५.०० वाजता काकडा आरती नंतर सप्ताहाची सांगता होईल. सर्व भाविक भक्तांनी नियोजित कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक व मुख्यपुजारी समाधान तुळशीराम महाराज डाकोरे व समस्त गावकरी मंडळी, गोपाळचावडी ता. जि. नांदेड यांनी केले आहे.
