
बिलोली| कुंडलवाडी व बिलोली शहरातील नगरपरिषदेत महायुतीची सत्ता येणार असून दोन्ही नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकेल असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी बिलोली येथील विश्रामगृह येथे झालेल्या पक्षप्रवेश व पदवाटप कार्यक्रमात व्यक्त केले. या प्रसंगी एस. सी. एस. टी. ओ. बी. सी. विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली कुंडलवाडी व बिलोली शहरातील शेंकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
बिलोली शहरातील विश्रामगृह येथे शिवसेनेचा (शिंदे गट) पक्षप्रवेश व पद वाटपाचा कार्यक्रम शनिवारी झाला असून या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे,मागासवर्गीय विभाग जिल्हाप्रमुख मंगेश कदम, तालूकाप्रमुख बाबाराव रोकडे पाटिल, बिलोली मागासवर्गीय विभाग तालूकाप्रमुख महेंद्र गायकवाड, शिवसेना ओ. बी. सी. विभागाचे जिल्हासचिव वैभव धनगे पाटिल अमदापुरकर, उमाकांत बादावार, बाळू जगडमवार,दिलीप दुगाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बिलोली तालूका युवासेना प्रमुखपदी अरविंद पवनकर, कुंडलवाडी शिवसेना शहरप्रमुखपदी लक्ष्मण गंगोने, कुंडलवाडी शिवसेना शहर संघटक पदी वेंकट श्रीरामें, कुंडलवाडी युवा सेना शहराध्यक्षपदी गंगाधर शिंदे,,उप तालूका प्रमुख अंकुश हिवराळे,बिलोली तालुका संघटक रमेश पवनकर,ओ. बी. सी. विभाग रामतीर्थ सर्कल प्रमुखपदी दिगांबर मेहत्रे अटकळीकर,
सोशल मीडिया प्रमुख गजानन कोपरे,किसानसेना तालुका प्रमुख पदी मारोती पाटिल सिद्धापुरे, तालूकाउपप्रमुख माधवराव शंखपाळे, बाबुमियाँ पिंजारी, मागासवर्गीय तालुका सचिवपदी रामचंद्र आदमनकर, एस टी विभाग बिलोली उपशहरप्रमुख पदी लक्ष्मण रायकंठवार, कल्याण मामीलवाड, कुंडलवाडी युवासेना उपशहरप्रमुखपदी चंद्रशेखर भोरे,कुंडलवाडी ओ. बी. सी. शहरप्रमुख पदी सुरेश राजडवार, उपशहरप्रमुखपदी दत्ता वारेवार यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी मारोती पाटिल, सुनील भास्करे, शेख रसूल,शिवा करोड,अतिश मठपती, अमोल कुलकर्णी,महमद इस्माईल यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिवसेनेत येणार -मंगेश कदम –मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन जिल्ह्यातील अनेक पक्षातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी तसेच एस. सी, एस. टी, ओबीसी समाजातील अनेक मोठे नेते लवकरच शिवसेनेत येणार असल्याचे मत यावेळी शिवसेना एस सी, एस. टी, ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी व्यक्त केले.
