हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिनाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वरत्न, संविधान निर्माते, महामानव तसेच आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून 26/ 11/2008 रोजी झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रा गुंडाळे एम.पी. हे लाभले होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. वसंत कदम हे उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संविधान प्रास्ताविकाचे वाचन कार्यक्रमाचे आयोजक व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डोंगरे एल.बी. यांनी केले. त्यांच्या समवेत उपस्थितांनी ही प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.वसंत कदम हे आपल्या मनोगतात म्हणाले की, “सामाजिक, राजकीय, आर्थिक, न्याय निर्माण करणे हा घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्देश होता. घटनेने या देशांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा निर्माण करून गोंधळात टाकणारी विविधता असणाऱ्या देशात एकता, एकात्मता, बंधुभाव निर्माण केला. म्हणून भारतीय संविधान हे देशाचा सर्वोच्च ग्रंथ आहे.” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे प्रा.पंडित हाके यांनी केले. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. डॉ. श्याम इंगळे, डॉ. संघपाल इंगळे, प्रा. विश्वनाथ कदम आणि साहेबराव आसळकर, श्विश्राम देशपांडे, राजू डोंगरगावकर, प्रभू पोराजवार आणि राहुल भरणे आदीसह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.