मृत्यूनंतर होणारी अवहेलना थांबविण्यासाठी वैकुंठधाम स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा केला निर्धार

हिमायतनगर, अनिल मादसवार| एक पाऊल स्वच्छतेकडे हि कास धरून हिमायतनगर येथील युवकांनी समिती तयार करून स्मशानभूमीचा कायापालट करण्याचं ध्यास घेतला आहे. यासाठी त्यांनी आज दि. 1 आक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छाजांली कार्यक्रम घेत लकडोबा चौकातील वैकुंठधाम स्मशानभूमीची स्वच्छता करून आदरांजली वाहिली आहे. श्रमदान करण्याचा हा कार्यक्रम असाच अविरत सुरू ठेवू अशी प्रतिज्ञा केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
हिमायतनगर शहरातील लाकडोबा चौक भागात असलेल्या हिंदू स्मशान भूमी दुर्लक्षित झाली होती, त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष वाढून स्मशानभूमी आली होती. हा प्रकार मागील काळात निधन झालेल्यांच्या अंत्यविधीला आल्यानंतर येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन मृत्यूनंतर होणारी अवहेलना थांबविण्यासाठी वैकुंठधाम स्मशानभूमी लकडोबा चौक चा कायापालट करून इतरांनी आपला आदर्श घ्यावा असे काम कण्याचा निर्धार युवकांनी केला. आणि स्वच्छतेचा ध्यास धरलेल्या युवकांमधून समिती नेमण्यात आली. या समितीचे अध्यक्ष श्यामभाऊ ढगे, सचिव – सुभाष बलपेलवाड, उपाध्यक्ष – लक्ष्मण डांगे, राम जाधव यांची नेमणूक करण्यात आली.
समितीच्या युवकांनी स्मशान भूमीला नावीन्यरूप देण्यासाठी आज दि. ०१ रोजी नवयुवक यांनी श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवले. या अभियानंतर युग सनीतीचे अक्कलवाड गुरुजी, चवरे साहेब, डॉ. राजेंद्र वानखेडे, वऱ्हाडे सर, कंठाळे सर, आशिष भाऊ सकवान, विलास वानखेडे, रामभाऊ सूर्यवंशी, संजय माने, वामन पाटील, गजानन हरडपकर, नपते दाजी, श्रीकांत घुंगरे, दत्ता पाटील सूर्यवंशी, साहेबराव अष्टकर, सुधाकर चिट्टेवार, देशमवाड मामा, कदम सर, बालाजी तोटेवाड, राजूदादा पानपट्टे, अनिल आरेपल्लू, या सर्वानी सहभाग घेऊन स्मशान भूमीची स्वच्छता केली आहे.
या सर्व उपस्तित सदस्यांनी श्रमदानातून स्वच्छता हा मंत्र घेऊन स्मशानभूमी स्वच्छ ठेवण्यासाठी सेवाधार्यांनी संकल्प केला आहे. त्यानुसार दर रविवारी स्मशानभूमी स्वच्छतेसाठी सकाळी श्रमदान करण्याचा हा कार्यक्रम असाच अविरत सुरू ठेवू अशी प्रतिज्ञा केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
आम्ही युवा मंडळींनी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू स्मशान भूमीचा कायापालट करण्याचा वसा घेतला आहे. आज अनेकजण श्रमदाच्या कामात सहभागी झाले आहेत. सध्या अनेकांच्या घरी बांधकामाच्या वेस्टेज साहित्य पडून आहे, त्या निरुपयोगी साहित्याचे दान स्मशान भूमीच्या सुधारणेकरी केल्यास त्याचा देखील फायदा होऊ शकतो. तसेच ज्यांना कुणाला श्रमदान करता येत नाही त्यांनी देणगी रूपातही सहकार्य करू शकतात. आज स्मशान भूमीच्या कामासाठी येथील शिक्षक सचिन कळसे यांनी फरशी दान स्वरूपात दिली आहे. अश्या प्रकारे सर्व नागरिकांनी देखील पुढे यायला हव असं आवाहन समितीचे अध्यक्ष श्यामभाऊ ढगे यांनी न्यूजफ्लॅश360डॉटईन च्या माध्यमातून केले.
