नांदेडराजकिय

हिमायतनगरच्या शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीची तालुकास्तरीय बैठक मंगळवारी

हिमायतनगर। येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीची तालुकास्तरीय बैठकीचे मंगळवारी दुपारी 12 वाजता आयोजन करण्यात आली आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष गोविंदराव गोखले यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात आगामी काळात केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. तसेच मागील तीन महिन्यापूर्वी हिमायतनगर येथील कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक बैठक झाल्या संघटन वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र आता या बैठकीतुन बुथबांधणी, सर्कल कार्यकारिणी, सभासद नोंदणी आणि विविध विषयावर चर्चा करून पक्षाची वाढीला गती दिली जाणार आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन पक्षाचे ध्येय धोरणं जनतेला पटवून दिले जाणार आहेत.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष हतीअंबीरे यांच्या आदेशानुसार हिमायतनगर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक मंगळवारी हिमायतनगर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष गोविंदराव गोखले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!