
हिमायतनगर। दिनांक:-23 एप्रिल 2024 हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालया मध्ये विलियम शेक्सपियर यांच्या जयंती निमित्त जागतिक पुस्तक दिन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर कार्यकमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल बोंबले राजू यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. उज्वला सदावर्त मॅडम म्हणून लाभल्या तर प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभागाचे प्रा.एम पी गुंडाळे हे होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.एम पी गुंडाळे यांनी विलियम शेक्सपियर यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला त्यांच्या ग्रंथ संपदा विषयी तसेच त्यांच्या साहित्या विषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे ग्रंथपाल बोंबले राजू यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त मान्यवरांना ग्रंथ भेट दिली.व युनिस्को द्वारे 1995 रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात येतो असे त्यांनी सांगितले .त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरन सांगितले की जर आपल्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या . रोटी तुम्हाला जगण्यास मदत करील.तर पुस्तक हे तुम्हाला जगावे कसे हे शिकवेल.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गुंडाळे सर यांनी प्रत्येकाने पुस्तक वाचलंच पाहिजे असे सांगितले.त्याचप्रमाणे ग्रंथालय मध्ये वाचक जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आला पाहिजे असे सांगितले. अध्यक्षीय समारोपामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. असे आपल्या भाषणातून सांगितले. आजच्या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानामध्ये मोबाईल पेक्षा पुस्तकाकडे लक्ष देणे आज काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
त्याच प्रमाणे दरवर्षी 23 एप्रिल या दिवशी दोन पुरस्कार Best Reader Award for student and Teacher दिले जातात . या वर्षीचे 2023-24 चे पुरस्कार प्राचार्य मॅडम यांनी जाहीर केले.
Best Reader Award for Teacher:- 01)प्रो.एल.बी डोंगरे राज्यशास्त्र विभाग, Best Reader Award for student:- 01)मोहम्मद मिनहाज मोहम्मद जाविद B.A.S.Y. मुलां मध्ये 02) शिंदे वैष्णवी विश्वनाथ B.A.F.Y. मुलीं मध्ये, कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन महाविद्यालयातील ग्रंथपाल बोंबले राजू यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक भदरगे सर यांनी केले.(कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी विभाग व ग्रंथालय विभागाद्वारे केले.) ग्रंथालय परिचर विश्राम देशपांडे यांनी अथक परिश्रम घेतले त्याचप्रमाणे इंग्रजी विभागातील सावंत सर गुंडाळे सर यांनी देखील अथक परिश्रम घेतले. व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
