नांदेडमनोरंजन

सप्त स्वर म्युझिक क्लब पुणे येथे नरसी चा पत्रकार शामसुंदर गायकवाड यांचा सन्मान

नायगाव। पुणे पिंपरी चिंचवड येथे संगीत उत्सव कार्यक्रम संगीत प्रेमी साठी आयोजित करण्यात आला असून सदर प्रोग्राम खूप सुंदर झाला. सकाळी 12.30 ते 11.45 ला आपले शेवटाचे गाणे यशस्वीपणे पार पडले. एकुण 104 गाणी पार पडली.

यासंपुर्ण कार्यक्रमात सुरवातीपासून श्री अनिल घाडगे सर व श्री नंदकुमार कांबळे सरांची मोलाची साथ मिळाली हाॅल बुकींग पासुन ते कलाकारांच्या जेवणाची , चहापाण्याची, पाहुण्यांच्या सत्काराची, प्रमुख पाहुण्यांना बोलावून त्यांचे आदरातिथ्य करण्यापर्यंतची जबाबदारी घाडगे सरांनी यशस्वीपणे पार पाडला. अल्पावधीतच वर्षानुवर्षे जुने मित्र असल्यासारखे वाटणारे माझे नविन मित्र श्री उत्तम जाधव, श्री विजय संबारे, डाॅ आकाश गिरबीडे हे खरतर कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले होते पण त्यांच्या स्वभावामुळे कार्यक्रमाचा मुख्य घटक बनुन गेले.

श्री उत्तम जाधव सरांनी बॅनर बनवण्यापासून ते मानपत्र लिहने, मला प्रत्येक वेळी कात्रज वरुन पिंपरीला येणे शक्य होत नव्हते तर स्थानिक सर्व जबाबदारी स्विकारली व शो संपेपर्यंत यशस्वीपणे पार पाडली, श्री विजय संभारे सरांनी तर प्रॅक्टिस दरम्यान मदत करत, तिकीटे तयार करणे, वेळोवेळी गाण्यांची यादी व जोडीदार लावण्याची यादी बनवने, ती कंप्युटर वर तयार करुन वेळोवेळी अपडेट करणे, आणि कार्यक्रमात शेवटपर्यंत कलाकारांनी कितीही त्रास दिला तरी त्यांचे ट्रॅक लॅपटॉपवर शोधुन लावणे सर्व नियोजनात आमच्या सोबत राहुन कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.

डाॅ आकाश गिरबीडे सरांनी तर आपल्या रुग्ण सेवेतून वेळ काढून कांही बॅनर बनवुन घेतले , ते जागोजागी लावण्यात मदत केली, हाॅलमध्ये पत्नीसोबत येऊन आपण एक डाक्टर आहोत सरकारी अधिकारी आहोत यांजवर भान विसरुन खाली बसुन प्रसंगी लोळून *उत्कृष्ट रांगोळी काढली सर्व नियोजनात कुठे काही कमतरता आहे का पाहुन शेवटपर्यंत घाडगे सरांबरोबर सुंदर डान्स करुन कार्यक्रमात रंगत आणली.

डाॅ. किशोर वराडे सरांनी कोणत्याही वेळेत आपला स्टुडिओ उपलब्ध करुन दिला व प्रॅक्टिस साठी मदत केली, रुग्ण सेवा थांबवुन कार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित राहून नियोजनात मदत केली. सौ कल्पना जगताप मॅडम नी कार्यक्रमात स्टेजवरील जबाबदारी स्विकारुन उत्कृष्ट निवेदन केले इतर सर्व नियोजनात हातभार लावला प्रत्येक गोष्टीत पडद्यामागुन सपोर्ट केला.

सौ सुजाता लोखंडे मॅडम नी आपल्या ओळखीतून कलाकारांना आमंत्रित केले व 100 चा अकरा पुर्ण करण्यात मदत केली, सर्व नियोजनात हातभार लावुन कार्यक्रमात प्रत्येक कलाकाराची सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र त्यात दिले, या कामात त्यांना सौ सुचिता शर्मा यांनी खूप मदत केली. सौ अमरजा कुरवीणकोप मॅडम कांही कारणास्तव कार्यक्रमात उपस्थित राहु शकल्या नाहीत पण सर्व 100 गाण्यांचे ट्रॅक डाऊनलोड करुन दिले.

श्री गुलचंद लोखंडे सरांनी 12 तास स्वतः उपस्थित राहुन सुदर साऊंड सिस्टीम दिली. श्री मिलिंद कानिटकर यांनी 12 तास उभे राहून सर्व गाण्यांचे शुटिंग केली, श्री अरुण सरमाने सरांनी उत्कृष्ट निवेदन केले. निर्मला अगरवाल मॅडम यांनी ट्राॅफी व श्री वसंत दानेज सरांनी सर्टिफिकेट साठी व रुपाली सस्ते यांनी प्रायोजक बनुन आम्हाला आर्थिक पाठबळ दिले. श्री राजाभाऊ तिखे सरांनी टिव्ही स्क्रीन दिला.

आपण सर्व सहभागी कलाकार यांनी सुंदर सादरीकरण केले अनेक लोक आहे ज्यांनी या कार्यक्रमात सहकार्य केले बरीच नावे मला माहीत नाहीत पण मी आपल्या सर्वांचा हार्दिक हार्दिक आभारी आहे. नियोजनात आमच्याकडून कांही चुका झाल्या असतील कुणाचे मन दुखावले असेल कोणाला त्रास झाला असेल तर मी सर्वांची दिलगीरी व्यक्त करतो. व पुढील काळात अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
× How can I help you?