नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ज्ञान स्रोत केंद्रात दिवाळी अंकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. प्रदर्शनात असे एकूण चौऱ्यांशी दिवाळी अंक ठेवण्यात आले आहेत.
या कार्यक्रमास विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी एम खंदारे, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक बच्चेवार, मानव्यविद्या विद्याशाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलजा वाडीकर, विद्यार्थ्यी विकास विभागाचे संचालक डॉ. सुर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, भूशास्त्र संकुलाचे संचालक तथा ज्ञान स्रोत समिती सदस्य डॉ. अविनाश कदम, भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. रमेश ढगे, माध्यमशास्र संकुलाचे डॉ. राजेन्द्र गोणारकर, ललित व प्रयोगजीवी कला संकूलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. पी. विठ्ठल, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. सुहास पाठक, डॉ. निना गोगटे, डॉ. झिशान अली यांचेसह प्राध्यापक, आधिकारी, कर्मचारी व संशोधक यांची उपस्थिती होती.
ज्ञान स्रोत संकुलाचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत करून दिवाळी अंकाची माहिती दिली. या प्रदर्शनात दीपोत्सव, लोकसत्ता, लोकप्रभा, साप्ताहिक, काल निर्णय, ओरिजनल जत्रा, संवाद सेतू, गंधाली, पुरुष स्पंदन, संगम, रविवारची धमाल जत्रा, मेनका, मिळून साऱ्याजणी, सृजन संवाद, प्रपंच, नवलकथा, पुढारी दीपस्तंभ, जडणघडण, ग्रहाकिंत, गृहलक्ष्मी, सत्याग्रही विचारधारा, श्री व सौ, मौज, नवल, शब्द शिवार, निनाद, हंस, आहेर, घरचा वैद्य, स्वरसाज, आरोग्यदीप, विपुल श्री, धनंजय, साहित्य सुगंध, वसुधा, चांगुलपणाची चळवळ, महाराष्ट्राची अस्सल विनोदी जत्रा, सोहम भगवती, ऋतुरंग, विनोदी कथा, अलका, साहित्य लक्ष्मी, रंभा, हेर, संयम, असावा पार्टनर, किशोर, तारांगण, माझे पुण्यभूषण, साधना, मनोकल्प, ग्राहक हित, आवाज, विजय तत्त्वज्ञान समता, मुक्त आनंदघन, सामना, एकच थरार, रागिनी, मोहिनी, पद्मगंधा, अक्षरदान, दुर्गाच्या देशातून, एकमेव वेगळा, साहित्य स्वानंद, आपले छंद, मानिनी, समतोल, दुर्ग गोंदवा, चपराक, ज्ञानाची किमया, बींइंग वुमन, मैत्र, महाराष्ट्र टाइम्स, द इनसाईट, चंद्रकांत, माहेर, मार्मिक, वसंत ग्रहबोली, ज्योतिष ज्ञान, उत्तम अनुवाद, ज्योतिष्य व उपासनेचा गृहसंकेत इत्यादी दिवाळी अंकांचा प्रदर्शनात समावेश आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जी. एन. लाठकर, विठ्ठल मोरे, संदीप डहाळे, दयानंद पोपळे, योगेश हंबर्डे, संजय करडे यांनी परिश्रम घेतले.
‘स्वारातीम’ विद्यापीठातील संलग्नीकरण विभाग १५ नोव्हेंबर रोजी सुरु राहणार
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता उच्च व तंत्र शिक्षण विभाग मुंबई यांच्या प्राप्त पत्रानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील नविन महाविद्यालय तसेच संलग्नित महाविद्यालामध्ये नविन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, तुकडी सुरु करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर देण्यात आलेली आहे. दि. १५ नोव्हेंबर रोजी दीपावली सणानिमित्त शासनाची सुट्टी असली तरी विद्यापीठातील शैक्षणिक संलग्नीकरण विभाग प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सुरु राहणार आहे. या मुदतीनंतर तसेच पोष्टाने किंवा कुरिअरने प्राप्त होणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे शैक्षणिक संलग्नीकरण विभागाचे उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे यांनी कळविले आहे.