नांदेड| दिनांक 08.02.2024 रोजी 17.30 ते 17.45 वाजता नांदेड बसस्थानक येथुन संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसमधील एका महीलेच्या पर्समधुन सोन्याचे दोन मंगसुत्र, सोन्याचे झुमके जोडी व नगदी 4000/- रुपये असा एकुण 1,04000/- रुपयाचा मुद्देमाल चोरी गेला वगैरे फिर्यादीवरुन पो.स्टे. वजीराबाद, नांदेड येथे दिनांक 13.02.2024 रोजी गु.र.न. 65/2024 कलम 379 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपासकामी सदरचा गुन्हा पोहेकॉ/1742 प्रदिप खानसोळे यांचेकडे देण्यात आला.
बसस्थानक परीसरामध्ये सदरचा प्रकार घडला असल्याने मा.श्री. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक, नांदेड, मा.श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा.श्री. सुशीलकुमार नायक, अ विभागीय पोलीस अधिकारीय विभाग इतवारा अति. चार्ज नांदेड शहर यांनी सदरचे चोरी करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करणेबाबत श्री परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड यांना सुचना केल्या. सदर सुचनांप्रमाणे पो.नि. श्री परमेश्वर कदम यांनी त्यांचे अधिनस्त गुन्हे शोध पथकाचे अधिकारी शिवराज जमदडे सहा, पो. नि. पोहेकॉ दत्तराम जाधव, पोहेकॉ मनोज परदेशी, पोना/विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, पोकों/शेख ईग्रान, पोकों/मेघराज पुरी, पोकों/अंकुश पवार, यांना घटना घडलेल्या परीसरातील सर्व सिसिटीव्ही फुटेज चेक करुन तसेच बातमीदार यांचेकडुन माहीती प्राप्त करुन आरोपी व गुन्हयातील
चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्याच्या सुचना दिल्या. सदर सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बसस्थानक परीसरात गुन्हेगार / पॉकीटमार चेक करीत असतांना बसमध्ये चढजार होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमध्ये एक ईसम गर्दीतील महीलांच्या पृष्ठभागाला खेटुन महिलेच्या ताब्यातील पर्स चापळत असतांना आढळुन आला. त्याच्या हालचालीवर सतत देखरेख ठेवता तो बऱ्याच महिलेसोबत अशा प्रकारचे वर्तन करीत असतांना आढळुन आला. त्यावरुन त्यास ताब्यात घेऊन त्यांचे नांवगांव विचारणा करता त्यांनी आपले नांव प्रल्हाद खंडुजी पांचाळ, वय 54 वर्षे व्यवसाय फर्निचर बनविने रा. ईंदीरानगर बारड असे सांगितले.
त्यास बसस्थानक परीसरात फिरण्याचे कारणाबाबत विचारणा करता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तसेच त्याचेकडे प्रवास अयोगी कोणत्याही प्रकारचे साधन मिळुन आले नाही. सदर ईसमाचा आम्हास संशय आल्याने त्याचे अंगझडतीमध्ये त्याचे उजवे पॅन्टचे खिशामध्ये दोन सोन्याचे झुमके व दोन मंगळसुत्र व मनी असलेली पोत आढळुन आले. सदर दागिण्यबाबत त्यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी ते दिनांक 08.02.2024 रोजी नांदेड बसस्थानक मध्ये संभाजीनगर कडे जाणाऱ्या बसमधील एका महीलेच्या पर्समधुन चोरी केल्याचे सांगितले.
सदर आरोपीस दिनांक 13.02.2024 रोजी पुढील तपासकामी पोहेकॉ/ प्रदिप खानसोळे व पोकॉ /प्रदिप कांबळे यांचेकडे दिले. त्यांनी नमुद आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीतांना दोन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन त्यांचेकडे ईतर गुन्हयांचे अनुषंगाने तपास चालु आहे. सदरचा गुन्हा 24 तासाचे आत उखडकीस आणलेबद्दल वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.