श्री. बालाजी मंदीर देवस्थान हडको अध्यक्षपदी अरूण दमकोडंवार बिनविरोध निवड

नवीन नांदेड। श्री. बालाजी मंदिर हडको संचालक मंडळाच्या तिन वर्षे पदाधिकारी निवडणूकीत अध्यक्षपदी अरूण दमकोडंवार यांच्या सह कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली.
बालाजी मंदीर हडको नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष,संचालक मंडळ निवड निवडणूक अधिकारी बाळासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२७ जानेवारी रोजी घेण्यात आली यावेळी परंपरेनुसार ही निवड तिन वर्षेसाठी करण्यात आली, अध्यक्ष अरूण दमकोडंवार तर उपाध्यक्ष प्रकाशसिंग परदेशी,सचिव बाळासाहेब मोरे, सहसचिव बाबुराव येरगेवार, कोषाध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण, कार्यकारिणी सदस्य, माणिकराव देशमुख, सुभाष कांरजकर, यांच्यी निवड करण्यात आली. या निवडीनंतर संचालक मंडळ यांच्ये अभिनंदन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून सिडको हडको सह परिसरातील ग्रामीण भागात नावलौकिक असुन या मंदिराने केलेल्या अनेक उपक्रम कौतुकास्पद असुन पुढील काळात ही मंदीरा काढुन अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नुतन अध्यक्ष अरूण दमकोडंवार यांनी सांगितले.
यावेळी नुतन संचालक मंडळ पदाधिकारी यांच्ये स्वागत संतोष वर्मा,पुजारी दुबे महाराज,प्रकाश महाराज,त्र्यंबक सरोदे, आंनदा सरजे, हारी सरजे तुकाराम पातेवार दिलीप कदम पाटील तुपेकर यांनी अभिनंदन केले.
