
नवीन नांदेड। भायेगाव येथे राजकीय नेत्याच्या गाव बंदीचे अज्ञात व्यक्तीने बॅनर फाडल्लयाचा कारणावरून नांदेड हैदराबाद रोडवर २६ आक्टोबर रोजी अचानक रास्ता रोको करण्यात आल्यामुळे काही वेळासाठी यावेळी जाणारी येणारी वाहतूक मोठया प्रमाणात खोळंबली होती.
यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप व पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अंमलदार यांनी भेट देऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वाहतूक सूरूळीत झाली. नांदेड हैदराबाद रोडवरील भायेगाव पाटी जवळ मराठा आरक्षण संदर्भात सर्वच राजकीय नेत्यांना गाव बंदी संदर्भात सकल मराठा समाज भायेगाव यांच्या वतीने २५ आक्टोबर रोजी बॅनर लावण्यात आले होते.
सदरील बॅनर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींने फाडून टाकल्याचे २६ रोजी सकाळी निदर्शनास आल्यानंतर सकाळी ८ वाजता भायेगाव पाटी येथे संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर,नारायण कोल्हे, राम कोचार,किशन कोल्हे,शिवाजी कोचार, संभाजी जाधव,साईनाथ खो सडे, चिमणाजी पाटील कदम,कैलास खोसडे,यांच्या सह भायेगाव, किक्की, कांकाडी, तुप्पा ,परिसरातील सकल मराठा समाज बांधवांनी भायेगाव पाटी येथे एकत्र येऊन नांदेड हैदराबाद रोडवरील रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यी वाहने मोठया प्रमाणात थांबली होती.
अखेर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप व उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार यांनी धाव घेऊन संबधित मराठा सकल समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन या प्रकरणी तात्काळ अज्ञात ईसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले, यानंतर रस्ता रोको आंदोलनकर्त्यांनी हा रस्ता रोको आंदोलन मागे घेतल्या नंतर वाहतूक सूरूळीत झाली.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात ईसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या रस्ता रोको आंदोलनामुळे मात्र नांदेड हैदराबाद रोडवरील जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांचा मोठया प्रमाणात रांगा लागल्या होत्या.
