
नांदेड। सकल मराठा समाजाची अस्मिता असणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर नांदेडमध्ये दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे व बेकायदेशीर लावलेली एस आय टी चौकशी रद्द करण्यात यावी म्हणून आज दिनांक सात रोजी सकल मराठा वकील समूह जिल्हा व सत्र न्यायालय नांदेडच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना निवेदन देण्यात आले.
दिनांक 4/3/2024 रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालयात सकल मराठा समाज नांदेड च्या वतीने मराठा संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदरील बैठकीस मार्गदर्शक म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितती लावली परंतु सततच्या उपोषण व दौऱ्यामुळे सोलापूर वरून परतताना त्यांची तब्येत खालावली तरी ही ते समाज बांधवांशी संवाद साधण्यासाठी आले येण्यास त्यांना विलंब झाला व बैठक नियोजित वेळेत पार न पडता उशिरा पार पडली असे असले तरीही कुठल्याही बेकायदेशीर कायदेशीर नियमांचे उल्लंघन न करता बैठक पार पडली.
जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन करतानाही संवैधानिक व अहिंसक आंदोलन करण्याचा सल्ला उपस्थित बांधवांना दिला.कुठलेही प्रक्षोभक विधान केले नाही किंवा कुठलाही अनुसूचित प्रकार सदरील बैठकीत घडला नाही अचार संहिता असली तरीही बैठक ही चार भिंतीत मंगल कार्यालयात पार पडली त्यामुळे नियम पायमल्ली तुडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .
केवळ सूडबुद्धीने सरकार पोलीस प्रशासनास हाताशी धरून कुरघोडी करून मनोज जरांगे यांना जाणीवपूर्वक विनाकारण कायदेशीर रित्या गोवण्याचा प्रयत्न करत आहे हे अत्यंत चुकीची व असंवैधानिक बाब असून आम्हा विधी तज्ञांना ही बाब विचार करण्यास भाग पाडत आहे. या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत.
मनोज जरांगे व बैठकीचे आयोजक श्याम वडजे यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे व मराठा आरक्षण आंदोलन मोडीत काढण्याकरिता शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्यावर बेकायदेशीर रित्या एसआयटी चौकशी स्थापन केली असून मराठा आंदोलकांवरती महाराष्ट्रभर ठिकठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत ते थांबवण्यात यावेत अन्यथा बैठकीत उपस्थित सर्व समाज बांधवांवर गुन्हे नोंदवावेत असा संतप्त सवाल सकल मराठा वकील समूहाच्या वतीने करण्यात आला.
