नांदेड। मायक्रो फायनान्स अर्थातच गोरगरीब महिलांचा समूह तयार करून अल्प कर्ज उपलब्ध करून आर्थिक हातभार लागावा म्हणून केलेली सुरवात आता मात्र महिलांना मानसिक त्रास,अपमानजनक वागणूक देणाऱ्या तसेच छळ करणाऱ्या संस्था म्हणून मायक्रो फायनान्स कंपण्या पुढे आल्या आहेत.
सुरवातीला एका गटा मार्फत कर्ज दिले जात होते आणि ते भरणे सहज शक्य होते. आता मात्र सावकारी कर्ज देणाऱ्या शकडो कंपण्या या क्षेत्रात उतरून फेड करण्यासाठी खाजगी गुंडा मार्फत गोरगरीब नारी शक्तीचा दररोज अवमान करीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नवनवीन येंत्रे बाजारात आली आणि मजूर आणि कामगारांना कायम काम मिळणे कमी झाले.
शरीराला कमी कॅलरीज मिळणारे हे या गटाचे सभासद आहेत.घरातील एखाद्याचा मृत्यू झाला तरी गटाचे पैसे भरावेच लागतात असे फर्मान सोडले जात असते आशा तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या असून असे फर्मान सोडणाऱ्यांना सीटू दणका दाखविणार असून त्यांच्यावर फोजदारी गुन्हे दाखल करणार आहे. देशातील कॉरपोरेट क्षेत्रातील कंपन्याचे आणि भांडवलदार घरान्याचे सरकारने किती हजार करोड रुपये माफ केलेत हे गटा मध्ये अडकलेल्या पीडिताना सांगितले जात आहे. आणि यापुढे कुणीही गांव सोडून जाण्याची गरज नाही.असा विश्वास निर्माण केला जात आहे.
कॉरपोरेट आणि भांडवलदार यांचे हजारो करोड रुपये माफ करणाऱ्या सरकाने त्याच धरतीवर अडचणीत आलेल्या आणि मागणी केलेल्या सर्व गट पीडितांचे अल्प कर्ज माफ करावे ही मागणी समोर आली आहे.किंवा परतफेड करण्यासाठी सवलत द्यावी. हफ्ता वसूल करण्यासाठी घरी खाजगी व्यक्ती येऊ नये,अपमानित करू नये आणि घर सोडून पळून जाण्यास भाग पाडू नये. बँके मार्फत उर्वरित रक्कम वसूल करावी आणि त्यास पाच वर्षाचा वेळ द्यावा. आदी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर दि.१८ ऑक्टोबर वेळ सकाळी ११ वाजता पासून पीडित गट धारकांचे बेमुदत उपोषण सुरु करण्यात येणार आहे.असे निवेदन दि.१३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी,तहसीलदार, जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था आणि पोलीस अधीक्षक नांदेड आदींना देण्यात आले आहे. निवेदनावर कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ. वर्षाताई इंगोले, कॉ. सोनाजी गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
भारत देशातील एक महिला सकाळी उठल्यावर दीड लाख रुपयांचा चहा पीते आणि त्याच देशातील काही महिला मायक्रो फायनान्सचा दीडशे रुपयांचा हफ्ता भरू शकत नाहीत. हे विषमतेचे विदारक चित्र आपल्या देशात निर्माण झाले आहे.कासारखेडा ता. जि.नांदेड येथील संघटनेचे सभासद असलेल्या मजुरावर गाव सोडून अज्ञात वासात जाण्याची वेळ आल्यामुळे सीटू कामागर संघटना आक्रमक झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील गटा मुळे अडचणीत आलेल्या सर्वांनी या उपोषणात आणि आंदोलनात सामील होण्याचे आवाहन सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.