नवीन नांदेड। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे
व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय स्तरीय टेनिस व्हॉलीबॉल शालेय स्पर्धा घेण्यात आल्या आहेत नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे क्रीडा क्षेत्रात यश संपादन केले आहे.

नांदेड येथे झालेल्या विभागीय स्तरीय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेमध्ये नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलचे 14 वर्षाखालील मुले यश संपादन केले आहे, यामध्ये गिरीश शिरसागर दर्शन उगवे, श्रवण पाटील, ऋषिकेश शिंदे, सक्षम गुळवे ,वीरेंद्र जमदाडे, या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर प्रथम येऊन त्यांची निवड राज्य स्तरावर झाली आहे.

या स्पर्धा सेलू जिल्हा परभणी येथे दिनांक 09 ते 11फेब्रुवारी 2024 आयोजित केल्या जाणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा सौ. शैला पवार संचालक श्री केशव गड्डम , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लता तम्मेवार श्री. श्रीकांत गड्डम व सौ.दुर्गा गड्डम,सूर्यकुमार पिल्ले,तसेच क्रीडा शिक्षक कासिम खान व निलेश डोंगरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे, तसेच पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version