नांदेड| महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड यांची आज दि.१ डिसेंबर २०२३ रोजी पतसंस्थेच्या मगनपुरा येथील कार्यालयात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व पंच यांची निवड प्रक्रिया प्राधिकृत अधिकारी अनिल घोगरे यांच्या मार्फत राबविण्यात आली. विकास सहकारी पॅनल प्रमुख सुभाष कल्याणकर यांची दुसर्यांदा चेअरमन पदी निवड, सचिव पदी सुरेश आरगुलवार, उपाध्यक्ष पदी देविदास पेंढारकर व पंच पदी माणिक गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित संचालक पप्पू देसाई नाईक, अशोक ढवळे, मोहन पेंढारे, विठ्ठल मोरे यांनी निवड प्रक्रियेत भाग घेतला. नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या निवड बदल शुभेच्छा देताना चंद्रभान धोंडगे, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पूलकंठवार, बालाजी आळणे,व्यंकटी बकाल, गणेश ताडेवाड, वनराज कदम, उत्तम कराड, माधव ईटकापल्ले, सुरेश पिंपळगावकर,शंकर चव्हाण, महेश सातारे, किरण कुलकर्णी सभासद व कर्मचारी पतसंस्थेचे लिपिक कैलास मोरे, श्रीमती मंगलबाई वानखेडे उपस्थित होते.