नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नांदेड येथील दैनिक एकमतचे पत्रकार राहुल गजेंद्रगडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरानां पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करून त्यांना कडक शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसिलदार धम्मप्रिया गायकवाड यांना देण्यात आले.
दैनिक एकमत चे पत्रकार राहुल गजेंद्रगडकर हे दि.३ मार्च रोजी वार्तांकनांसाठी फिल्डवर गेले होते. दुपारी ३:३० ते ४ च्या दरम्यान नादेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक कर्मचारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा निकाल घोषीत झाला. जुने भुविकास बैंक आयटीआय परिसर येथे निकालानंतर दोन गटात हाणामारी सुरु होती ही बाब लक्षात आल्यानंतर राहुल गजेंद्रगडकर यांनी घटनेचे छायाचित्र काढल्यानंतर ते एकमत कार्यालयाकडे येत असतांना त्यांना रस्त्यात अडवून अज्ञात तीघा जणांनी धक्काबुकी करत मारहाण केली. तेथील उपस्थित नागरीकांनी एकमतचे प्रतिधिनी गजेंद्रगडकर यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविले. त्यानंतरही राहुल गजेंद्रगडकर आपल्या कार्यालयाजवळ आले असता पुन्हा दोघांजणांनी त्यांना अडवले त्यांचा फोटो काढून जिवे मारण्याची धमकी दिली. पत्रकारावरील हा हल्ला निषेधार्थ आहे.
हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला असून ही मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही. यापूर्वी ही राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. पत्रकार संरक्षण कायदाअसला तरी त्याची कठोरपणे अमलबजावणी होत नाही. यामुळे असे हल्ले वाढत असून राज्यात पत्रकारांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.
नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दि.४ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर निर्देशन व आंदोलन करण्यात आले.
प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर,माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, माजी तालुकाध्यक्ष गंगाधर पा.भिलवंडे , गजानन चौधरी , नायगाव तालुकाध्यक्ष लक्ष्मण बरगे, तालुका सरचिटणीस रघुनाथ सोनकांबळे,पंडित वाघमारे , तालुका उपाध्यक्ष रामप्रसाद चन्नावार, गोविंद टोकलवाड , कैलास तेलंग, कोषाध्यक्ष साहेबराव धसाडे , दिलीप वाघमारे ,अंकुश देगावकर, सहदेव तुरटवाड, बालाजी हानंमते ,गंगाधर गंगासागरे ,राधाकृष्ण मोरे ,शंकर अडकीणे ,धम्मदीप भद्रे ,मारोती बुक्के ,अशोक वाघमारे ,दिलीप नखाते , आनंदा सुर्यवंशी आदी पत्रकारांची उपस्थिती होती .