महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा

नवीन नांदेड। श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर संस्थान, विष्णुपूरी, ता.जि. नांदेड येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र काळेश्वर मंदीर, विष्णुपूरी ता. जि. नांदेड येथे ०२ ते ०९ मार्च २४ पर्यंत ह.भ.प. राजेजी महाराज, हनुमान मंदीर पुजारी, विष्णुपूरी यांच्या कृपाशिर्वादाने तसेच ह.भ.प. भाऊसाहेब महाराज, पावडेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजित केलेले आहे.
दि.०२ मार्च २४रोजी श्रध्दास्थान ह.भ.प. राजेजी महाराज विष्णुपूरीकर यांच्या उपस्थितीत अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला तर ९ मार्च २४ रोजी सांगता होणार आहे. या सोहळ्यात व्यासपीठ प्रमुख भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर हे असुन सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ५ ते ६ काकडा भजन, स.६ ते ९ शिवलीलामृत पारायण, स.११ते १२ गाथा भजन, सायं. ६ ते ७ हरीपाठ व रात्री ७ ते १० हरी किर्तन होणार आहे.
०२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. पवन महाराज येस्तारकर रात्री ८ वाजता, ०३रोजी ह.भ.प. भगवान महाराज शेंद्रेकर , ४ मार्च रोजी ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर ०५ रोजी हभप.सोपान महाराज पांगरेकर, ०६ रोजी ह.भ.प.नवनाथ महाराज चिखलीकर, ०७ रोजी ह.भ.प. राम महाराज सुगावकर, तर (महाशिवरात्री) ०८रोजी ह.भ.प. भागवताचार्य दशरथ महाराज कोकाटे पळशीकर यांचे रात्री ८ ते १० कात्याचे किर्तन ,शनिवार, दि. ०९ मार्च २४ रोजी सकाळी ०७ ते ०९ ह.भ.प. वैजनाथ (बापू) महाराज कागदे उमरीकर काल्याच्या किर्तनानंतर, महाप्रसादास सुरुवात होईत.
शुक्रवार, दि. ०८ मार्च २४ रोजी महाशिवरात्री निमित्त रात्री १२.०० वाजता अध्यक्ष, काळेश्वर संस्थान व स्थानिक आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते श्री काळेश्वर भगवानचा महाअभिषेक होईल, तसेच रात्री १२.३० ते पहाटे ०५ या वेळात ईतर भाविक भक्तांचे अभिषेक होईल. या अखंड हरिनाम सप्ताहास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर (अध्यक्ष, श्री क्षेत्र काळेश्वर मंदीर संस्थान) व समस्त गावकरी मंडळी, विष्णुपूरी,यांनी केले आहे.
