नांदेड| मीमांसा फाउंडेशन, दैनिक समीक्षा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि मंथन क्रिएटिव्ह ग्रुप तर्फे दिला जाणारा मंथन क्रिएटिव्ह डिजिटल मीडिया पुरस्कार यंदा एमसीएन उर्दूचे युवा पत्रकार हैदर अली तर स्व. माधव अंबुलगेकर युवा पत्रकार पुरस्कार टीव्ही 9 चे यशपाल भोसले यांना जाहीर झाला आहे.
येत्या 5 जानेवारी रोजी होणार्या कार्यक्रमा दरम्यान पत्रकार हैदर अली व यशपाल भोसले यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अविनाश चमकुरे, कमलाकर पाटील, विलास आडे, कुवरचंद मंडले, सुरेश काशीदे, दिपंकर बावस्कर, रघुनाथ पोतरे, सचिन कावडे, प्रदीप घुगे, प्रशांत गवळे, अर्जुन राठोड, सुरेश आंबटवार, सुमेध बनसोडे, नारायण गायकवाड, दिनेश मुधोळकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.