माहूर तहसीलदार किशोर यादव यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीला दहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण ; कारवाई मात्र गुलदस्त्यात!

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| सोलापूर जिल्ह्यातील मोहळ चे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या विरुद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने त्यांच्याविरुद्ध नुकतीच निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र अनेक गंभीर स्वरूपाचे तक्रारी शासन दरबारी न्यायाच्या प्रतीक्षेत असताना सुद्धा माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांच्या विरुद्ध अनियमिततेचे सबळ पुरावे असताना देखील यादव यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप केला जात असून प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी यांचा वशिला यादव यांच्या विरुद्ध कार्यवाहीसाठी विलंब लावत असला तरी ‘देर है अंधेर नही’म्हणत न्यायपालिकेवर आपला विश्वास असल्याचे याचिके कर्ते साजीद खान यांनी म्हटले आहे.
माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांचा कार्यकाळ अतिशय वादग्रस्त राहला असून कर्मचाऱ्यापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी मानसिक त्रास दिल्याचे अनेक उदाहरणे आहे.एका महिला कर्मचाऱ्यांचे प्रकरण तर थेट आयोगा पर्यंत गेले होते,त्यात शेवटी वरिष्ठांनी मध्यस्ती करून मार्ग काढल्याने ‘समेट’होऊन प्रकरण शांत करण्यात आले होते,तर बनावट जात प्रमाण पत्राचा मुद्दा ताजा असून नुकतेच या बाबत तक्रारदारांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्या संबंधी न्यायालयात प्रकरण दाखल केल्याचे समजते,या शिवाय सर्वात मोठे व गंभीर प्रकरण केरोळी आणि वाई बाजार येथील भोगवटादार वर्ग दोन जमीनीचे असून रेती माफियांशी हात मिळवणी करून कुठले ही दंड न भरून घेता वाहन सोडल्याची तक्रार ही वरिष्ठ कडे प्रलंबित आहे.
या प्रकरणी तक्रारी झाल्याने तहसीलच्या आवारातून ट्रॅक्टर चोरून नेल्याची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वास्तविक ज्या अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी शासनाला प्राप्त होत असतात, त्याला प्रथम निलंबित करून तीन महिन्यांमध्ये विभागीय चौकशी पूर्ण करणे आवश्यक असताना आज किशोर यादव यांच्या विरोधातील विभागीय चौकशीला दहा महिन्याचा कालावधी लोटला असताना सुद्धा चौकशी पूर्ण करण्यात आली नाही.केवळ गंभीर स्वरूपाच्या तक्रारीच्या अनुषंगाने नाईलाजाने का असेना प्रशासनाला माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी लावावी लागली.
तेवढेच काय ते यादव यांच्या विरुद्ध प्रशासनाने उचलले पाऊल असून मंत्रालयात वशिला व जिल्हा प्रशासनात मदतगार असल्याने तहसीलदार यादव यांना चागलेच फावले असून त्यांनी माहूर मध्ये रेती उत्खननात आपले उखळ पांढरे करून घेतल्याचा ही आरोप असल्याने त्यांच्या माल मत्तेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करणे गरजेचे असल्याचे मत तक्रारदार यांनी व्यक्त केले आहे.एकंदरीत काल परवाच रेती डेपो संदर्भात उपोषणर्थ्यांच्या विरोधात अर्थात डेपो चालकांच्या फेवर मध्ये अहवाल देण्यासाठी ही डीलिंगी फिसकल्याची माहिती असून या बाबत ही तालुक्यात विविध चर्चेला उत आले आहे.
