करियरनांदेड

विघानिकेतन हायस्कूल हडकोचे विधार्थी तब्बल 22 वर्षानी स्नेहसंमेलन मुळे एकत्र..

नवीन नांदेड| तब्बल 22 वर्षानी एकत्र येत जुन्या आठवणीने वर्ग शाळेतील विद्यार्थी व विधार्थीनी एकत्र गहिवरून गेले असल्याचे हडको येथील विधानिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेतील वर्ग मित्र असलेले अनेक जण राज्यातील विविध पदावर अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले दिसून आले.

यावेळी स्नेहसंमेलन मध्ये अनेक गोष्टीवर दिलखुलास चर्चा झाली, ती केवळ आयोजित स्नेहसंमेलन मुळे. विद्या निकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळा हडको नवीन नांदेड या शाळेतील बालमित्र इयत्ता दहावी सन 2000 यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम तब्बल 22 वर्षांनी एकत्र झाला यावेळी 58 विधार्थीनी विधार्थी एकत्र येऊन हॉटेल आकृती जुना कौठा नांदेड येथे दिनांक 24 डिसेबंर 23 रोजी साजरा केला.

या वेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात नोकरीला असलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली, जुन्या आठवणीने,शाळेतील अनेक गोष्टी, वार्षिक स्नेह संमेलने यासह ईतर गोष्टी मध्ये अनेक विद्यार्थी सध्याचे अधिकारी गहिवरून गेले,या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शाळेचे शिक्षक सिन्नेवाड,काचावार, श्रीमती वाघमारे यांची या स्नेह संमेलन प्रसंगी उपस्थिती होती.उपस्थित शिक्षकांनी यावेळी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वीते साठी तुकाराम शिंदे, संदीप घोगरे, संतोष पल्लेवाड, संतोष इंगेवाड यांच्या सह मित्र वर्गाने , परिश्रम घेतले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!