नांदेडलाईफस्टाईल

उम्रज येथे राष्ट्रीय कृषी, नार्बाड व सगरोळी यांच्या तर्फे आयोजीत मोफत आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उस्माननगर। राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून कंधार तालुक्यातील उमरज येथे एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल प्रकल्प ( सि. सि. ए प्रकल्प ) कार्यरत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य विमा योजनेतून मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील गरजू रुग्णांनी आरोग्य तपासणी करून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरज नगरीच्या सरपंच जयश्रीताई जनार्धन केंद्रे या होत्या .तर प्रमुख पाहुणे म्हणून गणपंत शिवाजी राठोड , व्यंकटराव गायकवाड , डॉ. केद्रे ( उपकेंद्र प्रा. आ.उमरज ) ,रुग्णांची तपासणी करण्यासाठी व मार्गदर्शनासाठी आरोग्य तपासणी शिबिरास संजिवनी हाॅस्पीटल नांदेड येथील डॉ. शुभम जैस्वाल , डॉ. पांडुरंग कवटीकर , जेलब सीडम , पद्माकर पाटील ,आशा हाॅस्पीटल नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पुजा भगत डॉ. साहेबराव वाघमारे ,शिवम शिंदे , नागेश कदम राजहंस ढवळे व जोशी (PRO ) यांची उपस्थिती होती.यावेळी प्रमुख पाहुणे यांचा शाल हार घालून स्वागत,सत्कार करण्यात आला.

संत नामदेव महाराज पानलोट विकास समिती चे अध्याक्ष प्रतिनिधी व्यंकटराव जळबा गायकवाड , डॉ. केंद्रे ( प्रा.आ.उपकेद्र उमरज ) शिवाजी राठोड ,माधव गुट्टे , परमेश्वर तोरणे , अनुराधा पदमपल्ले , नागनाथ पदमपल्ले , कृष्णा केंद्रे ,आदी उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन करून गावातील सुमारे २५० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या आरोग्य शिबिरात स्त्रियांच्या आजारांवरील तपासणी, तसेच सर्दी , खोकला,ताप ,कंबर दुखी ,आदी शरीराच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या.

पात्र रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. संजविनी हाॅस्पीटल ,व आशा हाॅस्पीटल नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तर निवृत्ती जोगपेटे यांनी सुत्रसंचालन केले. आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रदीप कुमार काळबा भिसे ,इर्षद सय्यद , राहुल सिताराम तोरणे, यांच्या सह आदींनी परिश्रम घेतले . ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालय उमरज यांनी सहकार्य केले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!