करियरनांदेड

प्रा.डाॕ.मोहसीन खान यांना पीएच.डी(डाॕक्टरेट) पदवी प्रदान

बिलोली। बिलोली येथील अल ईम्रान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डाॕ.मोहसीन खान मुजीबपाशा यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड या विद्यापीठाच्या वतीने शारीरिक शिक्षण या विषयात पीएच.डी. (डाॕक्टरेट) ही शिक्षण क्षेञातील सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे.

त्यांनी डॉ. पि.एन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानी महिला खेळाडूंच्या विकासाकरिता निर्धारित केलेल्या विविध खेळातील उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात अभ्यास या विषयावर विद्यापीठास शोध प्रबंध सादर केला होता.पीएच.डी पदवीच्या मौखीक परिक्षेसाठी विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा चे अधिष्ठाता तथा चेअरमन डाॕ.सी.आर.बावीस्कर,बहिस्थ परिक्षक म्हणून डाॕ.तोरवी शिवसरन उपस्थित होते.

डाॕ.मोहसीन खान यांना पीएच.डी.पदवी मिळाल्याबद्दल शिक्षणशास्ञ संकुलाचे संचालक डाॕ.सिंकुकुमार सिंह,बोर्ड आॕफ स्टडीजचे चेअरमन डाॕ.कैलास पाळणे, डाॕ.गजमल, विद्यापीठाचे क्रिडा संचालक डाॕ.मनोज रेड्डी,डाॕ.भिमा केंगले,पानसरे महाविद्यालयाचे अध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर,सचिव सुनील बेजगमवार,संचालक प्रकाश पाटील अर्जुने,प्राचार्य डाॕ.अलीमोद्दीन,कार्यालयीन अधिक्षक राजु लापशेटवार, क्रिडा संचालक डाॕ.महेश वाकरडकर महाविद्यालयाचे सर्व वरिष्ठ व कनिष्ठ प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी,शासकिय अधिकारी, कर्मचारी, पञकार बांधव,सामाजिक कार्यकर्ते, मिञपरिवार, लोकप्रतिनिधी आदि सर्वांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!