युवकांच्या श्रमदानातून वैकुंठधाम स्मशानभूमीचा होतोय कायापालट – महाविरचंदं श्रीश्रीमाळ

हिमायतनगर| लकडोबा चौकातील वैकुंठधाम स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा ध्यास येथील युवकांनी घेऊन एक समिती तयार केली आणि श्रमदान करून दर रविवारी स्मशान भूमीला स्वच्छ सुंदर बनविण्याचा संकल्प केला आहे. हि गोष्ठ कौतुकास्पद असून, त्यांच्या या कार्याला शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह आता राजकीय नेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज रविवारी स्मशान भूमी विकास समितीच्या युवकांनी श्रमदानातून येथे बसविण्यात आलेल्या विद्दुत खांबाचे काँक्रेटीकरण करून योगदान दिले आहे. हे समजताच श्री परमेश्वर मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंदं श्रीश्रीमाळ यांनी भेट देऊन स्मशान भूमी विकास कामाची पाहणी केली आणि युवकांनी स्मशान भूमीच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले आहे.
नुकतेच लकडोबा चौकातील वैकुंठधाम स्मशानभूमीला खासदार हेमंत पाटील यांच्यावतीने ५० लक्ष रुपयाचा निधी देण्यात आला असून, यासाठी बाबुराव कदम कोहळीकर यांनी पाठपुरावा केला आहे. लवकरच या कामाला देखील सुरुवात होणार असून, यातून स्मशान भूमीत येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी शेड, मुख्य कमान यासह अन्य प्रकारचे सुशोभीकरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या विकासात्मक कार्यामुळे मृत्यूनंतर होणारी प्रेताची अवहेलना नक्कीच थांबेल असा विश्वास श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी व्यक्त केला. एव्हढेच नाहीतर त्यांनी स्मशान भूमीत बसविण्यात येणारी महादेवाची मूर्ती महाबलीपुराम येथून आणून देण्याचे आश्वासन दिले आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्मशान भूमी विकासासाठी १५ लक्ष रुपयाचा निधी देऊन सिमेंट काँक्रेट रस्ता कामाला सुरुवात केली आहे.
याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्यामुळे मागील काळात लकडोबा चौकातील स्मशान भूमीत झाडी झुडपे वाढून तसेच मातीचे ढिगारे व मोठं मोठ्या टोळके दगडांमुळे दयनीय अवस्था झाली होती. निधन झालेल्यांच्या अंत्यविधीला आल्यानंतर ये – जा करताना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रेताची मृत्यूनंतरची अवहेलना होत होती. हा प्रकार थांबावा यासाठी शहरातील युवकांनी संकल्प करून वैकुंठधाम स्मशान भूमीत श्रमदान करण्याचा कार्यक्रम दर रविवारी अविरत सुरू ठेवला आहे. आज श्रमदान करण्यासाठी आलेल्यां युवकांनी उभ्या करण्यात आलेल्या विद्दुत पोलचे काँक्रेटीकरण केले असून, नगरपंचायतीकडून या पोलवर एलईडी विद्दुत मर्क्युरी लाईट बसविले जाणार आहेत असे सांगण्यात आले आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष श्याम ढगे, सुभाष झरेवाड, वामनराव मिराशे, विलास वानखेडे, ज्ञानेश्वर शिंदे, डॉ.राजेंद्र वानखेडे, डॉ.विकास वानखेडे, आशिष सकवान, रामभाऊ सूर्यवंशी, साहेबराव अष्टकर, दशरथ हेंद्रे, लक्ष्मण डांगे, राम जाधव, राजदत्त सूर्यवंशी, श्रीकांत घुंगरे, रमेश कदम, बालाजी बनसोडे, सुधाकर चिट्टेवार, बालाजी तोटेवाड, बाळा किरकन, कानबा आरेपल्लू, लाईनमन परमेश्वर शिंदे, राज करोड, नारायण इरेवाड आदींसह समितीच्या इतर सदस्यांनी सहभाग घेतला होता.
