धर्म-अध्यात्मनांदेड
वाढोणा कालिंका मंदीरातील श्री नर्मदेश्वर महादेव शिवलिंग मूर्ती स्थापन वर्धापन विविध कार्यक्रमांनी साजरा

हिमायतनगर। शहरातील माता कालिंका मंदिरात गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या श्री नर्मदेश्वर महादेव शिवलिंग प्राणप्रतिष्ठा पणास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महिला मंडळीच्या वतीने रुद्रअभिषेक, महापूजा, हरिपाठ पारायण आदींसह विविध धार्मीक कार्यक्रम आयोजित करून उत्साहपूर्ण वातावरणात बुधवार दिनांक 26 रोजी वर्धापन उत्सव साजरा करण्यात आला.

हिमायतनगर शहराची कुलस्वामिनी नवसाला पावणारी माता कालिका देवी मंदिर पुरातन कालीन आहे या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या हर्षला साजरा केला जात असताना महिला मंडळीच्या पुढाकारातून गतवर्षी या मंदिरात नर्मदेश्वर महादेवाच्या शिवलिंग मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या हर्षोल्हासात करण्यात आली होती. त्या मूर्ती स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिनांक 26 बुधवारी महिला मंडळाच्या पुढाकारातून सकाळी 5 ते 7 या वेळेत नर्मदेश्वराचा रुद्राभिषेक सोहळा पुरोहित कांता गुरु वाळके यांच्या मधुर मंत्रोच्चार वाणीतून संपन्न झाला.

त्यानंतर नर्मदेश्वर महादेवाच्या मूर्तीची, अर्धनारी नटेश्वर स्वरूपात सजावट अमोल पिंपळे यांनी केली होती. तसेच माता कलिंका देवीचा देखील अभिषेक सोहळा संपन्न झाला, या अभिषेक सोहळ्याला पाच जोडप्यांनी उपस्थित लावून पूजा अर्चना केली. त्यानंतर सकाळी 7 ते 11 य वेळेत शिवलीलामृत चक्री पारायण करण्यात आले यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता.

त्यानंतर दुपारी 12 ते 2 या वेळेत महाप्रसाद वितरण करण्यात आले, दुपारी2 ते 5 या काळात भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला, यामध्ये नेहरू नगर भजनी मंडळ, श्री परमेश्वर भजनी मंडळाच्या महिला व पुरुष मंडळींनी सहभाग घेतला होता. सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व त्यानंतर दिपोत्सव आणि 7 ते 9 यावेळेत महिलांच्या विविध स्पर्धा घेऊन उत्सव साजरा झाला. त्यानंतर धार्मीक कार्यक्रमाचा समारोप सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या स्वागत सत्काराने करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनंदा दासेवार, संगीता साखरकर, चंद्रकला गुड्डेटवार, आदिंसह कालिंका गल्लीतील सर्व महिला मंडळींनी परिश्रम घेतले.

