![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2024/01/IMG-20240103-WA0006.jpg)
हिमायतनगर। कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा परिवार तर्फे ह्यावर्षीचा कै.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार परमेश्वरजी गोपतवाड यांना जाहिर झाला आहे याबद्दल त्यांचे सवाना ग्रामवासी यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यात निर्भीड पत्रकारिता करणारे जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कै. शंकरराव चव्हाण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल परमेश्वर गोपतवाड यांचा मुख्याधिकारी सुर्यकांत ताडेवाड यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी नंदु राऊत, संदीप भुसाळे,अनंता बोलसटवार, आशिष राऊत,शासकिय आश्रम शाळा दुधड चे सहशिक्षक आडबलवाड, गणेशराव भुसाळे, दिगंबर अनगुलवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)