लोहा। राज्याच्या पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथपालथ झाली असून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला त्यामुळे जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलणार आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात साठ वर्षा पासून सक्रिय असलेले पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी अशोकराव सोबत न जाता काँग्रेस पक्षातच राहण्याची भूमिका जाहीर केली आहे.मी काँग्रेसचा आहे आणि राहणार असे सांगून अशोकरावांच्या पक्षीय बदलाच्या भूमिकेवर यांनी कोणतीही प्रतिक्रिया नोंदविली नाही परंतु लबकरच जाहीरपणे आपले मत मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ ऍड ईश्वरराव भोसीकर यांनी १९६१ मध्ये काँग्रेस पक्षात सक्रिय झाले त्यांनी देशाचे नेते डॉ शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम केले त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सोबत ते होते . लोहा -कंधार एकत्रित तालुका असताना १९६५ मध्ये तालुकाध्यक्ष झाले .त्यानंतर १९७२ पासून चार वर्षे जिल्हाध्यक्ष झाले १९८३ मध्ये त्यांनी प्रदेश काँगेस सरचिटणीस म्हणून काम केले १०६७ ते १९७३या काळात विधानपरिषद सदस्य तर/१९८०ते १९८५ मध्ये या काळात कंधार मधून एकमेव आमदार म्हणून त्यांनी विधिमंडळात काम केले.
जिल्ह्याच्या राजकारणात अलीकडच्या दोन दशकात त्यांकडे जिल्ह्याच्या नेतृत्वाने दुर्लक्ष केले पण त्यांनी कधीच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली नाही ” या दोन्ही तालुक्यात फक्त ईश्वरराव भोसीकर व कुटुंब एकमेव आहे की ज्यांनी की पक्ष सोडला नाही तरीही पक्षातील” अमर”त्व धोरणाचा भोसीकराना राजकीय फटका सहन करावा लागला.
आता काँग्रेस पार्टी जिल्ह्यात अडचणी सापडली आहे असा काळात ज्यांना पक्षाने भरभरून दिले.पदे दिली आमदार मंत्री केले असाही पक्षाच्या अडचणीच्या काळात साथ सोडली पण आपला विश्वास काँगेस पक्षाच्या धर्मनिरपेक्ष विचार सारणीवर असून पक्ष्याच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी , प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व जेष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनावाखाली आपण काँग्रेस पक्षात सक्रिय राहू असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पहिल्या प्रतिक्रियेत कोणावरही टीकाटिप्पणी केली नाही पण काँगेस पक्षातच राहण्याची भूमिका घेतली.
जिल्ह्यात ते काँगेसचे एकमेव माजी आमदार व सर्वात जेष्ठ नेते आहेत त्याचे चिरंजीव जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, राजीव भोसीकर व समर्थकांनी काँग्रेस मध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे . अशोकरावांच्या पक्ष सोडण्याने या दोन्ही तालुक्यात किती पडझड होईल असे आरंभी सांगता येणार नाही पण कल्याणराव सुर्यवंशी व समर्थक, लोहा तालुका काँगेस अध्यक्ष शरद पाटील यांनी अशोकरावा सोबत जाण्याचे जाहीर केले. आहे तर दुसरीकडे पत्रकार परिषदघेऊन भूमिका मांडू असे माजी आ भोसीकर यांनी सांगितले.