उमरखेड, अरविंद ओझलवार। राज्य सरकारने मराठा समाजाला नुकतेच दिलेले दहा टक्के आरक्षण लागु केले परंतु मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी हे आरक्षण मान्य नसल्याचे सांगून सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असे आवाहन केले याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाज बांधवांना दि 24 फेब्रुवारीपासून रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत येथील स्थानिक संजय गांधी चौकात व पुसद रोडवरील पळसी फाट्या वर मराठा बांधवांच्या वतीने सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करत एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध केला आहे . जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारीपासून रास्ता रोको आंदोलन करण्याचे सांगितले असल्यामुळे या आंदोलनामुळे दैनंदिन जीवनमानावर परिणाम झाला आहे तसेच ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीची वाट पाहत बसावे लागले हे विशेष .

एकंदरीत पाहता जरांगे पाटील यांनी सर्व समाज बांधवांना शालेय विद्यार्थ्यांना कुठलाही प्रकारचा त्रास न होता आंदोलन करा असे आवाहन केले असताना येथील शालेय विद्यार्थी बस स्थानकावर एसटी बसची वाट पाहत बसले होते या शिवाय ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांची देखील हेळसांड होताना यावेळी दिसून आली सदर आंदोलनाला पोलिसांनी तगडा बंदोबस्त दिला होता त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही हे विशेष सदर आंदोलनामध्ये सकल मराठा समाज बांधव व महिला भागिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

